वासराची शिंगनळी जाळल्याने होणारे फायदे-तोटे

शिंगाचे दूध उत्पादनाच्या दृष्टीने फारसे महत्त्व नसते. त्यामुळे रासायनिक प्रक्रिया करून लहानपणीच वासरांची शिंगे काढली जातात, यालाच शिंगे खुडणे म्हणतात.
disbudding
disbuddingAgrowon

डीसबडिंग (disbudding) म्हणजे वासरे लहान असतानाच त्यांची शिंगनळी जाळली जाते. यामध्ये शिंगाना वाढीच्या अवस्थेतच अटकाव घातला जातो.दूध उत्पादनाच्या दृष्टीने शिंगाचे फारसे महत्त्व नसते. त्यामुळे रासायनिक प्रक्रिया करून लहानपणीच वासरांची शिंगे काढली जातात, यालाच शिंगे खुडणे म्हणतात.

शिंगनळी जाळताना वासरू लहान म्हणजे एका आठवडे वयाच्या आतच शिंगाची वाढ करणाऱ्या पेशी नष्ट केल्या जातात. असे केल्याने शिंगाचे मूळ कपालयुक्त कवटीपासून मुक्त होऊन, ते सहजपणे काढले जाते. शिंगनळी जाळून टाकण्यासाठी लाल तापलेल्या लोखंडाचा वापर करून, शिंगे काढल्यास, त्यावर अँटिसेप्टिक क्रीम लावावी. शिंगनळी जास्त कीटक असणाऱ्या हंगामात काढल्यास, जखमेवर फ्लाय रीपेलन्ट लावावे. गायीच्या वासराचे वय १० ते १५ दिवस असताना, तर म्हशीच्या रेड्काचे वय, ७ ते १० दिवस असताना शिंगनळी जाळून टाकली पाहिजे.

disbudding
जनावरांना किटोसीस होऊ नये म्हणून काय कराल? | Ketosis in Cow | ॲग्रोवन

जनावरांची शिंगे काढण्याचे फायदे-

शिंगे नसलेल्या जनावरांना कमी जागेची आवश्यकता असते.

शिंगे काढल्याने जनावरांना शिंगाचा कर्करोग होत नाही.

या जनावरांची काळजी घेणं, निगा राखणे, हाताळणे सोयीस्कर जाते.

प्रजातीनुसार ज्या जनावरांची शिंगे आत वळालेली असल्यास जखम होण्याची शक्यता असते.

disbudding
या कारणामुळे गाय गाभण राहत नाही! | Repeat Breeding In Cow and Buffalo | ॲग्रोवन

जनावरांची शिंगे काढण्याचे तोटे-

जनावरांचे वय ओळखण्याच्या पद्धतीमध्ये शिंगाची वलये मोजून अंदाजे वय काढले जात असल्याने, या प्रकारात अडथळा येतो.

प्रदर्शनासाठी बऱ्याचदा जनावरांची शिंगे रंगवून आकर्षक ठेवली जातात, त्यात कायमस्वरुपी बाधा येते. काही जनावरांची शिंगे ही त्यांची ओळख असते. त्यात कायमचा अडथळा येतो.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com