Lumpy Skin Disease : नांदेडमध्ये ‘लम्पी’चा पुन्हा शिरकाव

नांदेडमध्ये पुन्हा एकदा लम्पी स्कीन आजाराचा शिरकाव झाला आहे. गायवर्गीय जनावरांना बाधा झाल्यामुळे पशुपालकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Animal Care
Animal CareAgrowon

Nanded News : नांदेडमध्ये पुन्हा एकदा लम्पी स्कीन (Lumpy Skin Disease) आजाराचा शिरकाव झाला आहे. गायवर्गीय जनावरांना बाधा झाल्यामुळे पशुपालकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पशुपालकांनी या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून (Department Of Animal Husbandry) केले आहे.

नांदेड जिल्ह्यात मागीलवर्षी मोठ्या प्रमाणात लम्पी स्कीन आजाराचा गायवर्गीय जनावरांमध्ये प्रादुर्भाव झाला होता. यात जनावरांचा मृत्यूही झाल्याने पशुपालकांनी धास्ती घेतली होती.

Animal Care
Animal Care : व्याल्यानंतर गाई - म्हशींना कसा आहार द्यावा?

याकाळात पशुसंवर्धन विभागाकडून खबरदारीचा उपाय म्हणून लसीकरण तसेच गोठा निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. यानंतर मागील आठ दहा महिन्यापासून नियंत्रणात आलेला हा आजार पुन्हा बळावत आहे.

Animal Care
Animal Care : जनावरांच्या शरीर क्रियेत पाण्याचे महत्व काय आहे?

जिल्ह्यात अनेक ठिकाणी गायवर्गीय जनावरांना या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे पशुपालकांच्या तक्रारी आहेत. लोहा तालुक्यातही या आजाराचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये दिसून येत आहे.

जोमेगाव (ता. लोहा) येथील आदिनाथ राजीव शिंदे यांच्या गोऱ्यांच्या सर्व अंगाला गाठी दिसून येत असल्याने हा लम्पी स्कीन आजार सदृश आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत पशुपालकाने पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून उपचार सुरु केले आहेत.

या आजाराने पुन्हा डोके वर काढल्याने पशुपालक धास्तावले आहेत. याबाबत पशुसंवर्धन विभागाकडून व्यापक जनजागृती करून हा आजार अधिक वाढणार नाही याची काळजी घेण्याची मागणी पशुपालकांतून होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com