Lumpy Skin : लम्पी स्कीनचा प्रकोप रिसोडमध्ये सरूच

सप्टेंबर महिन्यामध्ये या आजाराचा शिरकाव तालुक्यात झाला होता. या आजारामुळे आजपर्यंत तालुक्यात ११० जनावरे दगावली आहेत. यात सर्वाधिक मृत्यू गायींचे झालेले आहेत.
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon

रिसोड, जि. वाशीम ः या तालुक्यात लम्पी स्कीन आजाराचा (Lumpy Skin) प्रादुर्भाव वाढत असून मागील चार महिन्यांपासून या आजाराने पशुपालकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. पशुवैद्यकीय अधिकारी प्रयत्न करीत असून मागील दोन महिन्यांपासून औषधी साठाही भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु तरीही लम्पी स्कीन (Lumpy Skin Outbreak) हा संसर्गजन्य आजार वाढत असून, पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Lumpy Skin
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’मुळे १३७ जनावरे दगावली

सप्टेंबर महिन्यामध्ये या आजाराचा शिरकाव तालुक्यात झाला होता. या आजारामुळे आजपर्यंत तालुक्यात ११० जनावरे दगावली आहेत. यात सर्वाधिक मृत्यू गायींचे झालेले आहेत. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी लसीकरणाचे काम युद्ध पातळीवर केले असून आजपर्यंत २७,८८१ जनावरांना लस देण्यात आली आहे.

Lumpy Skin
Lumpy Skin : ठाणे जिल्ह्यात मृत ५६ जनावरांसाठी भरपाई

आजपर्यंत तालुक्यात १२८९ गुरांना या संसर्गजन्य आजाराची लागण झाली आहे. गाई व वासरांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त राहलेले आहे. आधीच गायींची संख्या कमी आहे. लम्पी स्कीन आजारामुळे पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे. आजही तालुक्यात काही जनावरे गंभीर प्रादुर्भावग्रस्त आहेत. हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे थांबत नसल्याचे दिसून येत आहे.

सप्टेंबरच्या सुरुवातीला वाकद या ठिकाणी लम्पी स्कीनचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. सुरुवातीला खूप धावपळ झाली. मागील दोन महिन्यांपासून औषधसाठा भरपूर उपलब्ध आहे. काही ठिकाणी रिक्त पदांवर तात्पुरती नियुक्ती केली आहे. पशुपालकांनी आपल्या जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी.

-जयश्री केंद्रे, पशुधन अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, रिसोड.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com