Lumpys skin : बाधित जनावरे वाचविणाऱ्या पशुपालकांना मिळणार मानधन

पशुपालक मानधनासाठी बाधित झालेल्या जनावरांना मरणाच्या दारात सोडत आहेत
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon

औरंगाबादः  जिल्ह्यामध्ये लम्पी स्कीन (Lumpy Skin ) आजाराचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यात काही पशुपालक मानधनासाठी बाधित झालेल्या जनावरांना मरणाच्या दारात सोडत आहेत. यामुळे जनावरांच्या मृत्यूचा आकड्यात वाढ होताना दिसत आहे. जनावरांचे मृत्यू रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्यातर्फे लम्पी स्कीनबाधित झालेल्या जनावरे वाचविणाऱ्या पशुपालकांना ठरावीक मानधन व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी दिली.

जिल्ह्यात गेल्या महिनाभरात लम्पी स्कीन आजाराने थैमान घातलेले असून, आजपर्यंत ३१३ जनावरांचा मृत्यू झालेला आहे. तर, ४ हजार ४५६ जनावरे बाधित झाले असून ३ हजार १५६ जनावरे औषधोचाराने बरे झाले आहेत. आतापर्यंत १४२ जनावरांसाठीचे अनुदान संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. मृत जनावरांसाठी शासनाकडून मदत देण्यात येत आहे. मात्र जी बाधित जनावरे आहेत, त्यांची काळजी घेण्यासाठी कसलीही तरतूद नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या उपकरातून निधी देण्यात येणार आहे. यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येत असून पशुसंवर्धन आयुक्तांकडे यासंबंधी पत्र पाठविण्यात आल्याचे विकास मीना यांनी सांगितले.

Lumpy Skin
Lumpy Skin : लम्पीची मदत तोकडीच ? | ॲग्रोवन

लम्पी स्कीन आजाराने मोठ्या प्रमाणात पशुधन दगावत आहे. हा मृत्यूचा आकडा कमी व्हावा यासाठी जिल्ह्यात उपाय योजना करण्यात येत आहे. तसेच, या आजारातून जनावरांना बरे करण्यासाठी परिश्रम घेत असलेल्या पशुपालक व उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
-विकास मीना,
मुख्य कार्यकारी अधिकारी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com