Lumpy Vaccination : पशुपालकांनी जनावरांचे लसीकरण करून घ्यावे

पशुधनामध्ये होणाऱ्या लम्पी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पशुधन मालकांनी आपल्या निरोगी जनावरांचे तत्काळ लसीकरण करून घ्यावे व आजारी जनावरांवर उपचार करून घ्यावेत.
Lumpy Vaccine
Lumpy VaccineAgrowon

कोल्हापूर : पशुधनामध्ये होणाऱ्या लम्पी आजाराचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease) रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पशुधन मालकांनी आपल्या निरोगी जनावरांचे तत्काळ लसीकरण (Lumpy Vaccination) करून घ्यावे व आजारी जनावरांवर उपचार (Lumpy Treatment On Animal) करून घ्यावेत. तसेच मृत पशुधनाविषयी (Livestock) तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.

Lumpy Vaccine
Lumpy Skin : ‘लम्पी’ लसीकरणासाठी प्रति जनावरामागे २० रुपये आकारणी

या वेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण गोवंशीय पशुधन २ लाख ८३ हजार ६३७ आहे. आजपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात तयार झालेल्या पाच एपिक सेंटरमध्ये एकूण बाधित गाय वर्ग पशुधनाची संख्या ६५० असून त्यापैकी ५३५ गाई व ११५ बैल आहेत.

आजअखेर लम्पी स्कीन आजारावरील लसीकरण १ लाख ४७ हजार ३९० पूर्ण झाले आहे. त्यापैकी शासकीय संस्थांनी केलेले लसीकरण १ लाख ९८ हजार आहे. विविध संघ जसे ‘गोकुळ’, ‘वारणा’ व ‘स्वाभिमानी’ यांच्यामार्फत ७२ हजार ५० जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण उपलब्ध असलेला लसींचा साठा २ लाख ८५ हजार ४०० आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com