पावसाळ्यात जनावरांना हिरवा चारा किती द्याल?

थंड हवामानात जनावरांची उर्जेची गरज वाढलेली असते. अशा वेळी, जनावरांना जास्त प्रमाणात कोरडा चारा दिल्यास जनावरांना त्याच्या शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी उर्जेचा पुरवठा होतो.
Animal Feed Management
Animal Feed ManagementAgrowon

जनावरांच्या आहारात (Animal feed) बदलत्या ऋतुमानानुसार बदल करावे लागतात. आहारात कोणतेही बदल करताना, ते योग्य प्रकारे केल्यास, जनावरांवर कोणत्याही प्रकारचा ताण येत नाही. पावसाळ्यात वातावरणातील थंडपणा वाढलेला दिसून येतो. थंड हवामानात जनावरांची उर्जेची गरज वाढलेली असते. अशा वेळी, जनावरांना जास्त प्रमाणात कोरडा चारा (dry fodder) दिल्यास जनावरांना त्याच्या शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी उर्जेचा (energy) पुरवठा होतो. परिणामी जनावरांना थंड वातावरणाशी जुळवून घेणे सोयीचे जाते.

त्यामुळे पावसाळ्यात जनावरांच्या आहारात कोरड्या चाऱ्याचा समावेश करणे गरजेचं आहे. यासोबतच जास्त प्रमाणात उर्जा असणारा मक्याचा भरडा, गहू, बाजरीचा भरडा यांसारख्या उर्जायुक्त आहाराचा समावेश अर्धा ते एक किलोने वाढवावा. बायपास फॅटचा समावेश १०० ग्रॅम पर्यंत करावा. त्यामुळे दूध उत्पादन टिकून राहण्यास मदत होते.

Animal Feed Management
स्वच्छ दूध उत्पादनाची सूत्रे | Clean Milk Production | ॲग्रोवन

हिरव्या चाऱ्यामध्ये जवळपास ८० ते ८५ टक्के पाणी असते. हिरव्या चाऱ्यातून जनावरांना मिळणाऱ्या शुष्क पदार्थाचे प्रमाण कमी असते. जनावरांचे पोट भरल्यानंतरच ते रवंथ करु लागतात. हिरव्या चाऱ्याचा अधिक प्रमाणात समावेश केल्याने जनावरांचे शेण पातळ पडते. दुधातील घन पदार्थाचे प्रमाण कमी होते. म्हणून हिरव्या चाऱ्याबरोबर कोरडा चाराही समप्रमाणात गरजेचा आहे.

Animal Feed Management
लाल कंधारीचे दूध उत्पादन | Milk producing ability of Lal Kandhari Cow | ॲग्रोवन | Part-3

गायी म्हशीच्या आहारात बदल करताना, त्यांच्या दूध उत्पादन क्षमतेनुसार आणि वजनानुसार बदल केला पाहिजे. साधारणपणे ४०० ते ५०० किलोची गाय जर १५ ते २० लिटर दुधाचे उत्पादन देत असेल तर तिला, एकूण वजनाच्या तीन टक्के शुष्क आहार दिला पाहिजे. २० किलो हिरव्या चाऱ्यातून २ किलो शुष्क पदार्थ आणि १० किलो मुरघास मधून अडीच ते तीन किलो शुष्क पदार्थ मिळतो. एक किलो पशुखाद्यातून ९०० ग्रॅम शुष्क पदार्थ मिळतो. कोरडया चाऱ्यातून ९० टक्के शुष्क पदार्थ आणि १० टक्के पाणी मिळत असते.

एका गायीला दिवसातून ६ ते ७ किलो पशुखाद्य, २० ते २२ किलो हिरवा चारा किंवा १५ ते १६ किलो मुरघास, ५ ते ६ किलो कोरडा चारा एका दिवसातून दोन वेळा विभागून द्यावा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com