Animal Care : उन्हाळ्यात जनावरांच्या आरोग्यावर होणारे परिणाम

ज्या वेळी वातावरणातील तापमान कक्षेबाहेर जाते म्हणजे कमी किंवा जास्त होते अशा वेळी जनावराला आपल्या शरीरावर होणाऱ्या विपरीत परिणामांचा ताण सहन करावा लागतो.
Animal Care
Animal Care Agrowon

डॉ. पी. पी. घोरपडे, डॉ. आर. बी. अंबादे

Animal Health In Summer : ज्या वेळी वातावरणातील तापमान कक्षेबाहेर जाते म्हणजे कमी किंवा जास्त होते अशा वेळी जनावराला आपल्या शरीरावर होणाऱ्या विपरीत परिणामांचा ताण सहन करावा लागतो.

जनावराच्या शरीरात तयार होणारी ऊर्जा जनावर बाहेर टाकत असते. परंतु अशा वेळेस बाहेरील तापमान वाढल्याने ऊर्जा बाहेर टाकणे जिकिरीचे होते. त्यातच बाहेरील ऊर्जेचा भार अधिक वाढल्याने जनावराच्या ऊर्जा निस्सारण यंत्रणेवर याचा परिणाम होतो.

१) जनावराच्या हार्मोन्स निर्मितीत बदल होतो. त्यामुळे उत्पादन, आरोग्य, आहार व प्रजनन यांवर विपरीत परिणाम होतो.

२) शरीरातील अन्नघटक हे तापमान नियंत्रण करण्यासाठी वापरल्याने जनावर अस्वस्थ होते. जनावराचा आहार कमी होऊन तहान-भूक मंद होते.

३) जनावर तापमान नियंत्रण करण्यासाठी स्वत:ची यंत्रणा वापरण्यास सुरुवात करते. यामध्ये श्‍वासोच्छसाचा दर वाढून धाप लागल्यासारखे करते. तोंडाने श्‍वासोच्छवास करते. श्‍वासोच्छवास उथळ व जास्त वेगाने होतो. तसेच नाडीचा वेग वाढतो.

४) जनावरांचे डोळे, लालसर होऊन डोळ्यांतून पाणी गळते. पित्ताचा त्रास होऊन अतिसार होण्याची शक्यता असते. जनावराचे लघवीचे प्रमाण कमी होते.

५) गाभण गाईमध्ये गर्भ फेकण्याचे प्रमाण वाढते.

Animal Care
Animal Care In Summer : उन्हाळ्यात पशु-पक्ष्यांची कशी घ्यावी काळजी?

विशेष उपाययोजना ः

१) उन्हाळ्यात जनावरांना बसण्या-उठण्यासाठी सरासरीपेक्षा जास्त जागा देणे आवश्यक आहे. गोठा हवेशीर असावा. गरम हवा बाहेर जाण्यासाठी व थंड हवा आत येण्यासाठी पुरेपूर जागा असावी.

२) छताची उंची जास्त असावी व छतावर पंखे बसवावेत. छताच्या पत्र्याला जर पांढरा रंग दिला तर उष्णतेचे परावर्तन होऊन जनावरांना त्रास कमी होऊ शकतो. छतावर पालापाचोळा किंवा पाचट टाकल्यास उष्णतेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

३) गाईच्या अंगावर स्प्रिंकलर्स, फॉगर्स किंवा इतर मार्गांनी पाणी मारून शरीर थंड ठेवण्याचा प्रयत्न केला करावा.

Animal Care
Animal Care : लठ्ठपणामुळे जनावरावर काय परिणाम होतो?

४) गोठ्याच्या भोवती बारदाना बांधावा, जेणे करून आत येणारी गरम हवा थंड होऊन येईल. आतील थंड हवा आतच राहील.

५) जनावरांना जास्तीत जास्त वेळ पाणी पिण्यास उपलब्ध असेल, याची दक्षता घ्यावी.

६) जनावरांना जास्त चावावा लागणारा चारा हा सकाळ किंवा सायंकाळी द्यावा. या कालावधीत ताण सहन करण्यासाठी शरीरातील बिघडलेला क्षारांचा समतोल साधण्यासाठी योग्य प्रमाणात क्षार द्यावेत.

७) उन्हाळ्यामध्ये जनावरांना ४ ते ५ वेळ पाणी पाजावे किंवा शक्य असल्यास २४ तास उपलब्ध करावे

८) जनावरांच्या आहारात हिरव्या चाऱ्याचा समावेश असावा.

९) उन्हाळ्यात शरीराची ऊर्जेची गरज मोठ्या प्रमाणात वाढते. यासाठी आहारामध्ये ऊर्जा

देणारे पदार्थ (धान्य, गूळ, मळी, तेलयुक्त पेंड) तज्ज्ञांच्या सल्ल्याने द्यावी.

१०) खनिज मिश्रणाची मात्रा वाढवून द्यावी. तसेच मीठ व खाण्याच्या सोड्याचा आहारात समावेश करावा.

संपर्क ः डॉ. आर. बी. अंबादे, ८३५५९४२५४६

(मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com