Animal Health Management : जनावरांच्या खुरांचे आरोग्य व्यवस्थापन

Animal Care : जनवरांच्या शरीरात पायांचे खूर हे एक अतिशय महत्त्वाची अशी रचना आहे. खुरांची वाढ होणे ही एक नैसर्गिक आणि सततची प्रक्रिया आहे.
Animal Health
Animal HealthAgrowon

डॉ. जी. एस. सोनवणे, डॉ. व्ही. एम साळुंके

Animal Husbandry : जनवरांच्या शरीरात पायांचे खूर हे एक अतिशय महत्त्वाची अशी रचना आहे. खुरांची वाढ होणे ही एक नैसर्गिक आणि सततची प्रक्रिया आहे. जी जनावरे सतत चालतात किवा श्रमाची कामे करतात त्या वेळी खुरांची जमिनीशी घर्षण होऊन ती प्रमाणात वाढतात.

सध्या मात्र अयोग्य व्यवस्थापन प्रणालीतून, तसेच अतिशय छोट्या बंदिस्त जागेत जनावरांना बांधून दुग्ध व्यवसाय करणे, व्यवस्थित काळजी न घेणे, वेळेवर खुरांची छाटणी न करणे आणि व्यायामाचा अभाव यामुळे खुरांची अतिरिक्त वाढ होण्याचे प्रमाण वाढले आहे. हे बंदिस्त गोठ्यात जास्त प्रमाणात जाणवते.

याचा सर्वांत मोठा परिणाम हा उभे राहणे, हालचाल आणि होऊन आरोग्यावर दिसू लागतो. जनावर अशक्त दिसू लागतात. त्यामुळे त्यांची उत्पादनक्षमता कमी होते. खुरांची अतिरिक्त वाढ ही केवळ मोठ्या जनावरांत म्हणजे गाई आणि म्हशीतच नसून ती शेळीसारख्या लहान प्राण्यांत पण आढळून येते. वेळेत यावर उपाययोजना केली नाहीतर आर्थिक नुकसान सहन करावे लागते.

जनावरांच्या खुरांच्या आरोग्यकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते कारण या आजाराचा त्यांच्या आरोग्यावर आणि उत्पन्नावर होणारे परिणाम चटकन लक्षात येत नाहीत. खुरांची समस्या आपण पूर्णपणे रोखू शकत नसलो तरी सक्षम खूर व्यवस्थापन प्रक्रिया राबवून या समस्येवर मात करता येते.

Animal Health
Animal Husbandry Scheme : पशुसंवर्धन विभागातर्फे ‘जत्रा शासकीय योजनांची’

खुरांच्या अतिरिक्त वाढीची प्रमुख कारणे:

१) जनावरांना एकाच जागेवर जास्त वेळ बांधून ठेवल्याने खुरांचा जमिनीशी घर्षण नसल्याने सतत वाढतात.

२) आनुवांशिक, वंशागत गुणाचे संक्रमण किंवा शारीरिक विकृतीमुळे खुरांची अतिरिक्त वाढ आढळते.

३) जास्त वय झाल्याने खुरांची अतिरिक्त वाढ आढळते.

४) कॅल्शियमचे शरीरातून अतिप्रमाणात स्राव निघाल्याने खुरांची अतिरिक्त वाढ दिसते.

५) जनावर कमजोर असल्यास, संतुलित आहार नसल्यास, हालचाल कमी असल्यास.

प्रमुख लक्षणे :

१) खुरांची अतिरिक्त वाढ होऊन जनावरे चालण्यास असमर्थ होतात.

२) जनावरे आहार कमी घेऊ लागतात. जनावरे लंगडतात.

३) जनावरांची उत्पादनक्षमता कमी होते. खुरांत जखमा होतात.

४) माद्या माज दाखवत नाहीत, नर पशू प्रजननात उदासीनता दाखवतो.

५) खुरांच्या अतिरिक्त वाढीने चालताना जखमा होऊन त्यातून रोगजंतूचा शरीरात प्रसार होतो.

६) जनावर अशक्त आणि आजारी दिसते.

Animal Health
Animal feed : उन्हाळ्यात जनवारांना कसा आहार द्यावा?

उपचार :

१) ज्या जनावरांत खुरांची अतिरिक्त वाढ आहे त्यांना बाजूला घेऊन पशुवैद्यकाच्या मदतीने योग्य प्रकारे आणि योग्य अंतरावर कापणी करावी. नाहीतर रक्तस्राव होऊन त्यात जखम होऊ शकते.

२) शक्यतो तांत्रिकदृष्ट्या सक्षम व्यक्तीकडूनच खुरांची अतिरिक्त भाग कापावा.

उपाय आणि प्रतिबंध :

१) जनावरांना एकच जागेवर जास्त काळ बांधू नये.

२) शक्य असल्यास जनावरांना थोडा काळ चरण्यासाठी पाठवावे जेणेकरून खुरांची झीज होऊन ती अमर्याद वाढणार नाहीत.

३) खुरांची अतिरिक्त वाढ असणाऱ्या नर आणि माद्याची निवड करू नये.

४) कमी जागेत जास्त जनावरे ठेवू नयेत.

५) गोठ्यातील पृष्ठभाग हा एकदम गुळगुळीत किवा मऊ नसावा.

६) गोठ्याची नियमित स्वच्छता करावी.

७) खुरातील जखम कोरडी ठेवण्याचा प्रयत्न करावा. शेण, गोमूत्राचा जखमेशी संपर्क टाळण्याचा प्रयत्न करावा.

८) जनावरांच्या खुराच्या नाजूक भागात काटा, खिळा, तार अथवा खडा रुतला असता, तत्काळ खूर स्वच्‍छ करून काटा काढल्यास पुढील संभाव्य जखमेपासून जनावरांना वाचवता येते.

संपर्क : डॉ. जी. एस. सोनवणे, ८७९६४४८७०७, (क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com