Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’ नियंत्रणासाठी धावाधाव

अलिबाग, जि. रायगड ः जिल्ह्यात सध्या ‘लम्पी स्कीन’चे संकट घोंघावत आहे. या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभाग कामाला लागला आहे.
Lumpy Skin Disease
Lumpy Skin DiseaseAgrowon

अलिबाग, जि. रायगड ः जिल्ह्यात सध्या ‘लम्पी स्कीन’चे (Lumpy Skin Crisis) संकट घोंघावत आहे. या आजारावर नियंत्रण (Lumpy Skin Control) ठेवण्यासाठी जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभाग (Department Of Animal Husbandry) कामाला लागला आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या या विभागातील १०० दवाखान्यांपैकी ४० दवाखान्यांत पशुधन विभागाचे ६५ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळामुळे लम्पीवर नियंत्रण ठेवताना पशुसंवर्धन विभागाला कसरत करावी लागणार आहे.

जिल्ह्यात सुमारे १ हजार ८६४ गावे आहेत. या गावांमध्ये सुमारे दोन लाख ३९ हजार गाई, म्हशी असून तीनपेक्षा अधिक ठिकाणी गोपालन शाळा आहेत. जिल्ह्यातील गाई, म्हशींच्या माध्यमातून पशुपालकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत केला जात आहे. जिल्ह्यातील अनेक पशुपालकांना गाई, म्हशींच्या दुधापासून रोजगाराचे साधन खुले झाले आहे.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin : वाशीम जिल्ह्यात जनावरांच्या खरेदी-विक्रीसह गुरांचे बाजार बंद

ठाणे जिल्ह्यात दोन हजार ६२१ जनावरांचे लसीकरण

ठाणे : जिल्ह्यात लम्पी त्वचा आजाराचा शिरकाव केल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या आजाराचा प्रादुर्भाव होणाऱ्या जनावरांच्या संख्येत वाढ होत आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या जिल्हा पशुसंवर्धन विभाग लसीकरणासाठी सज्ज झाला आहे. त्यानुसार बाधित जनावराच्या ठिकाणापासून पाच किलोमीटरपर्यंतच्या परिसरातील जनावरांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin : ‘लम्पी’ नियंत्रणासाठी एक लाख लस मात्रा

शहापूर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर येथील दोन हजार ६२१ जनावरांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये जनावरांना लम्पीचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले होते. मात्र ठाणे जिल्ह्यात प्रादुर्भाव दिसून आला नव्हता. सोमवारी (ता. १२) तीन तालुक्यांमधील जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले. शहापूर तालुक्यातील दोन गाई, एक बैल; तर भिवंडी तालुक्यातील दोन गाई, अंबरनाथ तालुक्यातील एका बैलाला लम्पीचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले आहे.

गुजरातमधून येणाऱ्या पशुधनाबाबत खबरदारी

वसई, जि. पालघर : गुजरातमध्ये लम्पीचा धोका निर्माण झाला असताना पालघर जिल्ह्यातदेखील शिरकाव झाला आहे. वाडा येथे एका पशूला लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे गुजरातमधून येणाऱ्या जनावरांना बंदी घालण्यात आली असून, पोलिसांकडून सीमेवर नाकाबंदी करण्यात आली आहेत. तसेच पशुसंवर्धन विभागाकडून खबरदारी घेतली जात आहे. प्राण्यांमधील संक्रमण वाढू नये म्हणून लसीकरण तसेच विविध उपायोजना करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने तयारी केली आहे. लम्पीचा जिल्ह्यात शिरकाव झाल्याने पशुपालकांनी गोठ्यात स्वच्छता ठेवावी, लक्षणे आढळल्यास डॉक्टरांना संपर्क करून निदान करून उपचार घ्यावेत, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com