लेप्टोस्पायरोसिस आजाराची ही आहेत लक्षणे!

जास्त दुधाचे उत्पादन देणाऱ्या जनावरांमध्ये लेप्टोस्पायरोसिस (leptospirosis) रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. हा जीवाणूजन्य आजार असून १५० हून जास्त प्राण्यांच्या प्रजातीमध्ये हा रोग दिसून येतो.
लेप्टोस्पायरोसिस
लेप्टोस्पायरोसिसAgrowon

या आजाराचा प्रसार प्रामुख्याने पिण्याचे पाणी, गवत, चारा यांवर आजारी जनावरांचे मुत्र, गर्भाशयाचा स्त्राव पडल्याने होत असतो. बाधित जनावरांचे मुत्र या आजाराच्या प्रसारास कारणीभूत ठरतात. आजाराने बाधित जनावराच्या मूत्राद्वारे जवळपास ४० दिवस या रोगाचे जंतू बाहेर पडत असतात.

अति पावसाच्या प्रदेशात किंवा पाणथळ जागी जेथे पाणी साठून राहते तसेच ज्या ठिकाणी हवेत आर्द्रतेचे (humidity) जास्त प्रमाण आहे, अशा ठिकाणी लेप्टोस्पायरोसिस या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येतो. या आजाराचे जीवाणू उंदराच्या शरीरात सुप्त अवस्थेत असतात. त्यांच्या मलमूत्राद्वारे झपाट्याने या आजाराचा प्रसार होत असतो.

या आजाराचा प्रादुर्भाव तत्काळ तीव्र, तत्काळ सौम्य आणि दिर्घकालीन तीव्र या तीन टप्प्यामध्ये दिसून येतो. लहान वयाची वासरे या रोगाला पटकन बळी पडतात. चार महिन्यापेक्षा जास्त वयाच्या गाभण जनावरांमध्ये तसेच गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या जनावरांमध्ये गर्भपाताची समस्या दिसून येते. जनावरांनी कोणतेही लक्षणे न दाखविता, गर्भपात होणे, या आजाराचे मुख्य लक्षण आहे.

लेप्टोस्पायरोसिस
पावसाळ्यातील जनावरांचे आजार आणि उपाय योजना

या आजाराचे निदान करण्यासाठी – जनावरांच्या लघवीमधील रोगजंतूचा प्रादुर्भाव तपासून निदान करता येतो.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घूस, उंदीर यांची संख्या कमी करण्यासाठी गोठ्यात तसेच आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता ठेवावी. शरीरावर जखम असल्यास त्वरित उपचार करावेत. लक्षणानुसार प्रभावी प्रतिजैविके (antibiotic) पशुवैद्यकाच्या सल्ल्याने द्यावीत.

लेप्टोस्पायरोसिस
पावसाळ्यात जनावरांचे आहार व्यवस्थापन कसे करावे?

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com