Animal Health : उन्हामुळे जनावरांना ‘लू’ आजाराचा धोका

उन्हाळ्यात बहुतांश जनावरांना लू आजाराची लागण होण्याची शक्यता असते. यामध्ये गुरे दगावल्याने शेतकरी संकटात सापडतो.
Animal Diseases
Animal DiseasesAgrowon

Mahad News : उन्हाळ्यात बहुतांश जनावरांना लू आजाराची लागण होण्याची शक्यता असते. यामध्ये गुरे दगावल्याने शेतकरी संकटात सापडतो.

सध्या तापमान वाढल्‍याने लू आजाराची ही शक्यता गृहित धरून पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांसाठी उपचार पद्धती जाहीर करण्यात आली आहे. यामुळे पशुपालक व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

उन्हाळ्यात जनावरांमध्ये लू आजाराची लक्षणे आढळत असतात. संकरित जनावरे उन्हाळ्यातील अति उष्णतेचा त्रास सहन करू शकत नाहीत. गाईपेक्षा म्हशींना उष्णतेचा त्रास जास्त होतो. जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून यावर उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.

Animal Diseases
Wild Animal Crop Damage : चंदगडमध्ये शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चा

उन्हाळ्यात गुरांची काळजी व खाद्य

उन्हाळ्यात गुरांना हिरवा चारा खाण्यास द्यावा, दिवसातून तीन-चार वेळा पाणी पिण्यास द्यावे, गुरांना पाण्यात मीठ आणि पीठ टाकून पिऊ घातल्यास ते फायदेशीर असते. उन्हाळ्यात हिरवा चाऱ्याची कमतरता असते.

यामुळे पशुपालकांनी जानेवारीमध्ये मूग, मका, कडवल आदी पिके लावावीत. यामुळे उन्हाळ्यात गुरांना हिरवा चारा उपलब्ध होईल. कार्बोहायड्रेट अधिक प्रमाण असलेले खाद्य द्यावे, गुरांच्या चाऱ्यात अमिनो पावर आणि ग्रो बी-प्लेक्स मिसळावे, उष्णता वाढल्याने गुरांच्या पचनशक्तीवर परिणाम होतो. त्यांची भूक कमी होत असते.

अशावेळी जनावरांचा खुराक वाढविण्यासाठी गुरांना नियमितपणे ग्रोलिव फोर्ट दिले पाहिजे, वयस्कर गुरांना ५० ते ६० ग्रॅम इलेक्ट्रॉल एनर्जी आणि वासरांना १० ते १५ ग्रॅम इलेक्ट्रॉल एनर्जी दररोज द्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

वेळीच उपचार महत्त्वाचे

मोकळी जागा राहील, हवा खेळती राहील, अशी शेड जनावरांसाठी असावी. कधी-कधी नाकातून रक्त आल्यास बर्फ किंवा गार पाण्याच्या पट्ट्या जनावरांच्या डोक्यावर बांधाव्यात. गुरांना दररोज १ ते २ वेळा गार पाण्याने अंघोळ घालावी.

इलेक्ट्रॉल एनर्जी द्यावी. जनावरांसाठी २४ तास स्वच्छ पाण्याची उपलब्धता असावी. उन्हापासून वाचण्यासाठी पशुपालन करणाऱ्यांनी शेडमध्ये पंखा, कुलर, किंवा फवारा सिस्टीम लावावी, गुरांना दिवसा शेडमध्ये बांधावे, लू आजाराची लागण झाल्यानंतर तत्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दाखवावे.

Animal Diseases
Animal Care : जनावरांना चिलेटेड खनिजे देण्याचे फायदे काय आहेत?
तापमान वाढल्‍याने गुरांना त्रास होण्याची शक्‍यता आहे. लू आजाराबाबत पशुपालकांनी आवश्यक काळजी घ्यावी तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, कार्यालयाकडे संपर्क साधावा.
डॉ. आर.बी. काळे, जिल्हा पशुसंवर्धन, उपआयुक्त

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com