जनावरांना डोळ्याचे कोणते आजार होतात?

जनावरांच्या डोळ्यांची योग्य निगा न राखल्यास जनावरांचे डोळे निकामी होऊ शकतात.
Cow Eye Health
Cow Eye HealthAgrowon

पशुपालन करत असताना, जनावरांच्या विविध नाजूक अवयवांची विशेष काळजी घ्यावी लागते. जनावरांचे डोळे हा त्यापैकीच एक अवयव. जनावरांच्या डोळ्यांची योग्य निगा न राखल्यास जनावरांचे डोळे निकामी होऊ शकतात.

जनावरांच्या डोळ्यांचा (cow eye) विचार करता जनावरांचे डोळे चमकत असतात. प्राण्यांच्या डोळ्यात असणाऱ्या टपेटम लुसिडम (Tapetum Lusidum) या पडद्यामुळे जनावरांचे डोळे चमकत असतात. हा बदल जनावरांना अंधारात दिसण्याकरता झालेला आहे. मात्र हे प्राणी सर्व रंग माणसासारखे पाहू शकत नाही.

उन्हाळ्यात डोळ्यांची आग होऊन, सतत पाणी येत राहते. उन्हाळ्यात डोळे लालसर होतात. सुरवातीला निळसर पांढरा असलेला डोळ्याचा भाग संसर्गामुळे पिवळा होत असतो.

जनावरांचे डोळे सुजणे-

- डोळ्यांला मार लागल्यास डोळ्याच्या आतील भागातील दाब वाढतो. परिणामी डोळे सुजतात
- अशा वेळेस सुरवातीच्या अवस्थेत डोळ्याला बर्फ लावावा. जास्त मार लागलेला असल्यास त्वरित पशुवैद्यकाशी संपर्क साधावा.

Cow Eye Health
जनावरे वारंवार उलटण्याची समस्या

डोळ्यांना इजा होणे-

- विविध कारणामुळे जनावरांच्या डोळ्यांना इजा होते.
- शेतात काम करीत असताना किंवा चारा खाताना चाऱ्याचे खुसपट डोळ्यात गेल्याने डोळ्यांना इजा होत असते.
- काही वेळेस दुसऱ्या जनावरांची शिंगे डोळ्याच्या भागाला लागल्याने सुद्धा इजा होते. धारधार वस्तू डोळ्याच्या आतील भागात खोलवर जाऊन बसल्याने डोळ्यांच्या पडद्यांना इजा होऊन डोळे कायमस्वरूपी निकामी होऊ शकतात.
- डोळ्यांना कोणतीही जखम किंवा इजा झाल्यास डोळा स्वच्छ ओल्या कापडाने झाकावा.
- कपड्यात बर्फ घेऊन जखमेवर धरल्यास रक्तस्त्राव थांबतो किंवा कमी होतो.
- शस्त्रक्रियेची गरज असल्यास तातडीने पशुवैद्यकाच्या सल्ल्याने करून घ्यावी.

Cow Eye Health
जनावरे रवंथ कसे करतात?

डोळ्यांचा कर्करोग

- जनावरांना डोळ्यांचा कर्करोग होण्याची अनेक कारणे असू शकतात. उन्हाळ्यात जनावरांना जास्त वेळ उन्हामध्ये ठेवल्यास सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांमुळे डोळ्यांचा कर्करोग होऊ शकतो.
- वेळेत उपचार न केल्यास जनावरांचा डोळा निकामी होऊ शकतो.
- डोळ्यात मोठी गाठ झालेली असल्यास पशुवैद्यकामार्फत शस्त्रक्रिया करून घ्यावी.

गोठ्यात जनावरे बांधण्याच्या ठिकाणी टोकदार, धारधार वस्तू असणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. जनावरांच्या डोळ्यांवर कोणत्याही अघोरी पद्धतीने उपचार करू नयेत. डोळ्यांच्या आजारावर त्वरित पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com