Livestock Exhibition : शिर्डीतील पशुप्रदर्शनात तेरा राज्यांतील जनावरे

राज्यातील बहूतांश शेतकरी पशु-पक्ष्यांचे पालन करतात. दूध व्यवसायावर सुमारे सत्तर ते अंशी टक्के शेतकरी अवलंबून आहेत.
Livestock Exhibition
Livestock ExhibitionAgrowon

Animal Care News नगर ः राज्यातील व राज्याबाहेरील जातीवंत पशु-पक्षांची माहिती व्हावी आणि शास्त्रोक्त पद्धतीने संगोपण करण्यासाठी लागणाऱ्या यंत्रे, उपकरणे, औषधे वव पशुसंवर्धन (Animal Husbandry) बाबीविषयी शेतकऱ्यांसाठी शिर्डी (ता. राहाता) येथे या महिनाअखेर राज्यस्तरीय पशु-पक्षी प्रदर्शन (Livestock Exhibition) आहे. या प्रदर्शनात महाराष्ट्रासह देशातील तेरा राज्यातील जनावरे, शेळ्या-मेंढ्याचा सहभाग राहणार आहे.

प्रत्येक जातीच्या शेळ्या-मेंढ्या, दहा जनावरांचे किमान एक युनिट आणण्याचे नियोजन सुरू आहे. तीन दिवसीय या पशुप्रदर्शनात राज्यभरातून किमान पाच लाख शेतकऱ्यांनी भेट देणे अपेक्षित आहे.

पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने नगर जिल्ह्यात पहिल्यांदाच राज्यस्तरीय पशु-पक्षी प्रदर्शन होत आहे. राज्यातील बहूतांश शेतकरी पशु-पक्ष्यांचे पालन करतात. दूध व्यवसायावर सुमारे सत्तर ते अंशी टक्के शेतकरी अवलंबून आहेत.

त्यामुळे शासन, पशुसंवर्धन विभागाकडून जास्तीचे दूध देणाऱ्या गाई, म्हशी, जातीवंत देशी जनावरांचे संवर्धन, संगोपनातील नवीन तंत्रज्ञान देण्याचा सतत प्रयत्न राहिलेला आहे.

जातीवंत पशु-पक्ष्यांची ओळख व्हावी यासाठी यंदा पहिल्यांदाच नगर जिल्ह्यातील संत साईबाबाच्या शिर्डी नगरीत पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने या महिन्यात २४ ते २६ मार्च या कालावधीत राज्यस्तरीय पशु-पक्षी प्रदर्शन होत आहे.

अजून तारीख निश्चित केली नसल्याने त्यात बदल होऊ होऊ शकतो, असे सांगितले. राज्यस्तरीय पशु-पक्षी प्रदर्शनात सहभागी पशु-पक्ष्यांमधून सर्वोत्कृष्ट पशुधनाची निवड करून पशुपालकांना सन्मानित केले जाणार आहे.

पशुपालकांना सहजपणे प्रदर्शन पाहता यावे त्या दृष्टिने नियोजन करण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यात अशा पद्धतीने होणारे पहिलेच प्रदर्शन असल्याने पशुपालकांना चांगली संधी उपलब्ध होत असून तीन दिवसात किमान पाच लाखापेक्षा अधिक शेतकरी, पशुपालकांनी भेटी द्याव्यात असे अपेक्षित आहे.

Livestock Exhibition
Animal care : जनावरांसाठी युरोमोल चाटण वीट कशी तयार करावी?

या पशुप्रदर्शनात महाराष्ट्र, हरियाना, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक व जम्मू काश्मीर या राज्यांतील शेळ्या-मेंढ्या, जनावरांचा सहभाग राहणार आहे, असे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे यांनी सांगितले.

गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्यासह विविध जातीच्या कोंबड्या, कुत्रे, गाढवे, यात सहभागी असतील त्या दृष्टिने नियोजन केले जात असून देशभरातील ज्या भागातून जनावरे येथे आणली जाणार आहेत, त्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी माहिती व संकलनासाठी नियुक्त केले आहेत.

पशुप्रदर्शन सहभागी होणारे पशुधन

गाई ः गीर, काकरेज, (गुजरात), थारपार, राठी (राजस्थान), साहीवाल (पंजाब), हरियाना गाय, वेंचूर (केरळ), अमृतमल, हालीकर, कृष्णावॅली (कर्नाटक), ओनोल, पुगानुर (आंध्रप्रदेश व तेलंगणा) माळवी (मध्यप्रदेश), खिलार, देवणी, लालकंधारी, गवळाऊ, डांगी, कोकणकपील, कणगी, एचएफ, जर्शी (महाराष्ट्र),

म्हशी ः जाफराबादी, मेहसना, बन्नी, निलीरावी (गुजरात), मुऱ्हा (हरियाना), भदावरी ((मध्य प्रदेश), पंढरपुरी, मराठवाडी, जाफराबादी, नागपुरी, पुर्णाथडी,

शेळ्या ः शिरोही (राजस्थान), बिटल (पंजाब), बारबेरी, जामनापरी (उत्तर प्रदेश), कन्नीयाडू, कोरडीयाडू (तमिळनाडू), तेल्लीचेरी (केरळ), उस्मानाबादी, संगमनेरी, कोकणकन्याळ, अफ्रिकन बोर, सानेन, अल्फाईन, शेवाणबर्ग,

मेंढ्या ः मालवाडी, मालपुरा (राजस्थान), काश्मिरी, मरीनी, गद्दी, चेंगु (जम्मू काश्मीर), मंड्या (कर्नाटक), नेल्लोर (आंध्रप्रदेश, तेलंगणा), चैन्नईटेड, रामनंदपुम व्हाईट, वेंचूर, निलगिरी, मिचीबलाच, कोईमतुर यासह महाराष्ट्रातील विविध जातीच्या मेंढ्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com