पावसाळ्यात जनावरांना 'हे' आजार होऊ नये म्हणून काय करावे?

पावसाळ्यात जनावरांना विविध आजारांची बाधा होत असते. या विविध आजारांमध्ये पोटाचे आजार, कासेचे आजार, खुरांचे आजार तसेच परजीवीमुळे होणारे आजार यांचा समावेश होत असतो.
Animal Diseases in rainy season
Animal Diseases in rainy seasonAgrowon

पावसाळ्यात (rainy season) नवीन उगवलेलं गवत जनावरांनी जास्त प्रमाणात खाल्ल्याने जनावरांना पोटफुगीचा (bloat) त्रास होतो. पोटफुगीच्या एका प्रकारात पोटात मोकळी हवा साचून राहते. दुसऱ्या प्रकारात हवेबरोबर पाणी पण साचून राहते. कोवळे लुसलुशीत गवत जास्त प्रमाणात खाल्ल्याने जनावरांना नायट्रेट विषबाधा (nitrate) होण्याचीही शक्यता असते. विषबाधेची तीव्रता जास्त असल्यास जनावराला चक्कर येऊन ते खाली पडते. पावसाळ्यात जनावरांना डायरिया, जंत प्रादुर्भाव (Worm Infection) होण्याचीही शक्यता असते.

पावसाळ्यात सततच्या ओलसर वातावरणामुळे जनावरांमध्ये कासेचे आजार दिसून येतात. धार काढल्यानंतर सडाचे छिद्र जवळपास ४५ मिनिटे बंद होत नाही. ओलसर ठिकाणी जनावर बसल्यास दगडीचे जीवाणू (Mastitis) या उघड्या छिद्रातून कासेत प्रवेश करतात. दगडीमध्ये जनावरांच्या कासेतून लालसर रंगाचे दूध बाहेर येते. स्ट्रेप्टोकोकस जीवाणूमुळे संसर्ग झाला असल्यास, कासेच्या खालील बाजूस सूज येते. सडाभोवती माशा बसलेल्या दिसतात. ई. कोलाय जीवाणूंचा प्रादुर्भाव झालेला असल्यास जनावरांना खूप जास्त ताप येतो.

Animal Diseases in rainy season
पावसाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापन

पावसाळ्यात जनावरांचे पाय सतत चिखलात किंवा ओलसर राहिल्याने खुरे नरम पडत असतात. नरम पडलेल्या खुरांना जखम फार लवकर होते. परिणामी जनावरांना खुरांचा संसर्ग झालेला दिसून येतो. खुरांना जखम झाल्याने जनावर लंगडायला लागते.

Animal Diseases in rainy season
जनावरांचे मान्सूनपूर्व लसीकरण का करावे?

पावसाळ्यातील वातावरण दमट असल्याने गोचीडांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत असते. गोचीडमुळे जनावरांना थायलेरीया, बबेशिया, अनाप्लाझ्मा यांसारख्या आजारांची बाधा होत असते. गोचीड प्रादुर्भाव झाल्याने जनावर अस्वस्थ होते. गोचीड परजीवी असल्याने जनावरांच्या शरीरातील रक्त पिऊन स्वतःचे पोट भरत असतात. त्यामुळे जनावरांना गोचीड तापाची बाधा होत असते. तीव्रता जास्त असल्यास जनावरांना रक्ताची कावीळ होत असते.

Animal Diseases in rainy season
जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण गरजेचं !

जनावरांना पोटाचे आजार होऊ नये म्हणून पावसाळ्यात उगवलेला हिरवा चारा अधिक प्रमाणात खाण्यास देऊ नये. पोटफुगीवरील औषध गोठ्यात आधीच आणून ठेवले पाहिजे. कासेच्या आजारांचे प्रतिबंध करण्यासाठी दूध काढल्यानंतर जनावराला चारा आणि खुराक दिले पाहिजे. परिणामी जनावर उभे राहून खाल्ल्याने सडाच्या उघड्या छिद्रातून जीवाणू आत जाण्यास अटकाव बसतो. दूध काढल्यानंतर सड टीट डीप मध्ये बुडवून घ्यावीत. गोठ्यात दुधाळ जनावरे बांधण्याच्या जागेवर चुन्याची भुकटी पसरवून घ्यावी. जेणेकरून गोठ्याचा परिसर निर्जंतुक राहील. जिवाणूजन्य आजार होऊ नये म्हणून लसीकरण केले पाहिजे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com