Lumpy Vaccination : एकाच निडलने केले जनावरांचे लसीकरण

लम्पी स्कीन’च्या नियंत्रणासाठी प्रशासनाकडून होणाऱ्या कामात खीळ घालण्याचा प्रयत्न वडुरा गावात उघडकीस आला आहे.
Lumpy Vaccination
Lumpy VaccinationAgrowon

अमरावती ः ‘लम्पी स्कीन’च्या नियंत्रणासाठी (Lumpy Skin Disease) प्रशासनाकडून होणाऱ्या कामात खीळ घालण्याचा प्रयत्न वडुरा गावात उघडकीस आला आहे. या गावात एकाच निडलने सर्व जनावरांचे लसीकरण (Lumpy Skin Vaccination) करण्यात आले आहे. परिणामी, लम्पी स्कीनचा संसर्ग (Lumpy Skin Infection) वाढल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित डॉक्‍टरवर कारवाईची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

पूर्व विदर्भात सुरुवातीला अकोला व त्यानंतर अमरावती जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव वाढीस लागला. त्याच्या नियंत्रणासाठी काम सुरू असतानाच पशुसंवर्धन विभागाची अनेक प्रकारची अनागोंदी समोर आली होती. त्यामध्ये अमरावती जिल्ह्याने आघाडी घेतली. त्याच शृंखलेत पुन्हा नव्या आणि गंभीर प्रकरणाची भर पडली आहे.

Lumpy Vaccination
Lumpy Vaccination : सिंधुदुर्गमध्ये ६४ टक्के जनावरांचे लसीकरण

चांदूर बाजार तालुक्‍यातील खराळा येथे लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाला होता. त्याचा प्रसार रोखण्यासाठी वडुरा येथे तळवेल पशुवैद्यकीय दवाखान्याच्या वतीने डॉ. .... एलोरकर यांनी जनावरांचे लसीकरण केले. त्यासाठी पशुपालकांकडून प्रत्येकी दहा रुपये वसुल केल्याचा आरोप आहे. त्यानंतर संबंधित डॉक्‍टरने एकाच सिरींज व निडलने संपूर्ण गावातील जनावरांना लस टोचली.

Lumpy Vaccination
Lumpy Vaccination : लोकसहभागातून ६४ हजारांवर पशुधनाचे लसीकरण

लम्पी स्कीन हा संसर्गजन्य रोग असल्याने एक निडल दुसऱ्या जनावरांना वापरु नका, असे पशुपालकांनी त्यांना वारंवार सांगितले. परंतु, ‘इतक्‍या निडल, सिरींज उपलब्ध नाहीत. एकच निडल वापरल्याने जनावरांना काहीच फरक पडत नाही,’ असे बेजबाबदार उत्तर डॉ. एलोरकर यांच्याकडून देण्यात आले, असा आरोप शेतकरी सुधीर ठाकरे यांच्यासह पशुपालकांनी केला आहे.

...अन्यथा आंदोलनाचा इशारा

गावात लसीकरण केल्यानंतर तिसऱ्या दिवशी बैल आजारी पडला व दगावला. त्यानंतर लम्पी स्कीन आजाराचा प्रसार होत आणखी जनावरे दगावण्याची भीती पशुपालकांमध्ये आहे. त्यामुळे संबंधित दोषी पशुवैद्यकावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. पशुवैद्यकावर कारवाई न झाल्यास दगावलेली जनावरे जिल्हाधिकारी कार्यालयात आणून टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com