Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’ नियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती

लम्पी स्कीन आजाराचा प्रतिबंध, नियंत्रण व निर्मूलन करण्यासाठी तसेच गोवंश बरोबरच म्हशींच्या वाहतूक, बाजार, जनावरांची जत्रा व जनावरांच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आला आहे.
Lumpy Skin
Lumpy Skin Agrowon

पुणे ः लम्पी स्कीन आजाराचा (Lumpy Skin Disease) प्रतिबंध, नियंत्रण व निर्मूलन करण्यासाठी तसेच गोवंश बरोबरच म्हशींच्या वाहतूक, बाजार (Livestock Market Closed), जनावरांची जत्रा व जनावरांच्या प्रदर्शनावर बंदी (Ban On Animal Exhibition) घालण्यात आला आहे.

Lumpy Skin
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’च्या अफवेचा चिकन, अंड्यांच्या दरावर परिणाम

हा रोग नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांची त्यांच्या उपविभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये पुढील आदेश होईपर्यंत सनियंत्रण अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

Lumpy Skin
Lumpy Vaccination : ऊस वाहतुकीत बैलांचे लसीकरण बंधनकारक

उपविभागीय अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील तालुक्यांमध्ये व गावांमध्ये जनावरातील लम्पी स्कीन रोग नियंत्रणासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्याशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करावी.

गोवंश व म्हशी यांच्या वाहतुकीवर बाजार भरवण्यावर, जनावरांची जत्रा व जनावरांच्या प्रदर्शनावर बंदी घालणे व आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com