Lumpy Skin : सांगलीत शेळ्या, मेंढ्यांच्या बाजारावरील बंदी उठवली

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराचा प्रभाव वाढत चालल्याने जनावरांचा आठवडा बाजार बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon

सांगली ः गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराचा (Lumpy Skin Disease) प्रभाव वाढत चालल्याने जनावरांचा आठवडा बाजार बंद (Livestock Market) करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता; मात्र गाय आणि म्हैसवर्गीय जनावरांत लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Outbreak) असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मिरज, कवठे महांकाळ, जत, माडग्याळ येथील शेळ्या-मेंढ्यांचे बाजार (Sheep Goat Market) सुरू करण्याचे आदेश प्रशासनाने शुक्रवारी (ता. २३) दिले.

Lumpy Skin
Lumpy Skin : बैलपोळ्यावर ‘लम्पी स्कीन’चे सावट

जिल्ह्यात उद्भवलेल्या गाय, म्हैसवर्गीय पशुधनातील लम्पी स्कीन आजाराच्या पार्श्वभूमीवर या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्यात काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अनिवार्य असल्याने जनावरांच्या बाजारावर बंदी आदेश काढण्यात आला होता.

परंतु जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्तांनी २२ सप्टेंबर रोजी लम्पी स्कीन हा त्वचाआजार फक्त गाय व म्हैस जनांवरामध्येच दिसून आला असून शेळ्या, मेंढ्या व इतर जनावरांत लम्पी स्कीन आजार आढळलेला नाही, असे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीला कळवले आहे. त्यानुसार शेळ्या, मेंढ्यांचे बाजार सुरू राहणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com