
दुधात असणाऱ्या विविध घटकांच्या संतुलित प्रमाणामुळे दुधाला आपण पुर्णान्न (complete food) म्हणत असतो. शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असणारे सर्व घटक जसे की,कि प्रथिने (protein), खनिजे, जीवनसत्वे आणि स्निग्ध पदार्थ दुधात योग्य प्रमाणात असतात.
दुधात असणारे स्निग्ध पदार्थ आणि सॉलिड नॉट फॅट (SNF) यांच्या प्रमाणावरून दुधाची किमंत ठरविली जाते. स्निग्ध पदार्थांमधून मिळणाऱ्या उर्जेचे प्रमाण प्रथिने आणि कर्बोदकाच्या दुप्पट असते. एक कप गायीच्या दुधात १४८ कॅलरीज असतात तर म्हशीच्या दुधात २३७ कॅलरीज असतात. गायी म्हशींपासून मिळणाऱ्या दुधात सारखेच घटक हे कमी अधिक प्रमाणत आढळून येतात.
गाय, म्हैस, शेळी, मेंढी यांसारख्या प्राण्यांच्या दुधातील घटकांचे प्रमाण पहिले असता. असे लक्षात येईलकी, शेळीच्या दुधामध्ये स्निग्धांशाचे प्रमाण सर्वाधिक असते. शेळीच्या दुधात फॅटचे प्रमाण सर्वाधिक असले तरी, तरी ते पचायला हलके असते. कारण शेळीच्या दुधातील फॅटच्या कणांचा आकार इतर प्राण्यांच्या दुधातील फॅटच्या आकारापेक्षा लहान असतो. यामुळेच शेळीच्या दुधाला नॅचरल होमोजिनाईझ मिल्क (natural Homogenized milk) असे म्हटले जाते.
दुधात असणारे सॅच्युरेटेड स्निग्ध पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. दूध व दुधापासून बनविलेले पदार्थ हे उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी मदत करतात. दुग्धजन्य पदार्थामध्ये विषेशतः दह्यामध्ये कँसोकेनीन आणि लॅक्टोकीनीन बायोॲक्टिव्ह पेप्टाईड असतात. हे बायोॲक्टिव्ह पेप्टाईड उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी मदत करतात. काही पेप्टाईड आपल्या शरीरामध्ये रक्ताची गाठ होऊ देत नाही. व्हे प्रोटिनमुळे लो डेन्सिटी लायपोप्रोटिन(LDL) कमी प्रमाणात तयार होते. दुधामधील काही पेप्टाईड जिवाणू किंवा विषाणूंना मारण्यास मदत करतात. त्यामुळे मानवी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.