Buffalo Management : हिवाळ्यातील म्हशींचे प्रजनन व्यवस्थापन

देशातील एकूण दुध उत्पादनामध्ये ५५ % पेक्षा जास्त म्हशीच्या दुधाचा वाटा आहे. अधिक दुध उत्पादनाकरीता म्हशीमधील प्रजनन सक्षम असणं महत्वाचं आहे.
Buffalo Management
Buffalo ManagementAgrowon

देशातील एकूण दुध उत्पादनामध्ये (Milk Production) ५५ % पेक्षा जास्त म्हशीच्या दुधाचा वाटा आहे. अधिक दुध उत्पादनाकरीता म्हशीमधील प्रजनन सक्षम असणं महत्वाचं आहे. 

वगारी लवकर वयात येणं किंवा गर्भधारणा होण्याकरिता सक्षम असणं, व्याल्यानंतर ८० ते ८५ दिवसात म्हशीमध्ये पुन्हा गर्भधारणा होणं, माजाचे नियोजन, म्हणजेच योग्य माज ओळखणं व वेळीच रेतन करणं गर्भधारणेच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं. वीण्याची प्रक्रिया सुलभ होणं, वंध्यत्वाचे प्रमाण व इतर प्रजनन विषयक अडथळे फायदेशीर व्यवसायाच्या दृष्टीने कमी असणं गरजेचं असतं. म्हशींमधील प्रजनन सुरळीत राहण्यासाठी म्हशींच्या व्यवस्थापनात पुढील बाबींकडे लक्ष द्यावे.

जनावरांचे हिवाळ्यातील प्रजनन

ऋतुमानानुसार प्रजननातील बदल 

- ऋतूमानानूसार म्हशीमधील प्रजनन प्रक्रियेत वेगवेगळे बदल होत असतात. त्यामुळे वातावरणातील बदलानुसार प्रजनन कार्यात वेगवेगळा बदल दिसून येतो.

- म्हशीकरिता हिवाळा व पावसाळा हे दोन ऋतू प्रजननाकरिता पोषक असतात. 

- सर्वसाधारणपणे उन्हाळयात म्हशीमध्ये मुका माज दिसून येतो. ऋतूमानानूसार गर्भधारणा होणं, अथवा न होणं, गर्भपात होणं किंवा विण्याच्या प्रक्रियेत बदल होणं या व इतर अनेक बाबीमध्ये बदल दिसून येतो.

- हिवाळा म्हशीमधील प्रजनन कार्याकरिता पोषक असतो. ज्या म्हशी उन्हाळ्यात माज दाखवत नाहीत त्या म्हशी हिवाळ्यात माज दाखवतात. अशा म्हशींना रेतन करणं गरजेचं असते.

- म्हशींमध्ये प्रजनन क्रिया हिवाळ्यात जास्त सक्रीय होत असते. या दरम्यान बहुतांश म्हशी गाभण राहतात व हाच कालावधी विण्याचाही असतो.  

Buffalo Management
गाभण काळातील गायी-म्हशींचे व्यवस्थापन

अति थंड वातावरणामध्ये म्हशींची काय काळजी घ्याल?

- अति थंड वातावरणामुळे म्हशींतील उत्पादन व प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो व उत्पादकता कमी होते जसं की, दुध उत्पादन घटतं, माज दिसून येत नाही यासह इतर समस्या उद्भवतात.

- म्हशींचे थंडीपासून संरक्षण होण्यासाठी म्हशीच्या अंगावर गोणपाट टाकावा.

- म्हशींना पिण्यासाठी हलकेसे गरम पाणी द्यावे. 

- गोठा उबदार राहण्यासाठी शेकोटी पेटवावी.  

- गोठ्याच्या चारही बाजू किमान रात्रीच्या वेळी बंद ठेवाव्यात.

प्रजननातील विविध अडथळे कोणते ?

वातावरण बदलामळे निश्चितच म्हशीतील प्रजनन कार्यात विविध अडथळे दिसून येतात. यामध्ये मुका माज किंवा क्षीण माजाचा प्रकार, वंध्यत्वाची समस्या दिसून येतात. 

माजावर न येणे,  सतत उलटणे, गाभण न राहणे, विण्याच्या प्रक्रियेत अडथळा, वार न पडणे, गर्भपात होणे, ई. ज्या म्हशीमध्ये तात्पुरते वंधत्व असते व सतत उलटणे वगैरे सारखे प्रजननातील अडथळे असतील तर वेळीच आधुनिक पद्धतीचा त्वरित उपचार करून घेणे गरजेचं असतं.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com