बैलांचे खांदे का सुजतात?

खरिपाची कामे सुरु झाली कि, बैलांचा शेतीकामांसाठीचा वापर वाढतो. बैलांच्या खाद्यांवर सतत जू ठेवल्याने त्यांच्या खांद्यांना सूज येत असते.
Bullock Hump Swelling Treatment
Bullock Hump Swelling Treatment Agrowon

बैलांच्या खांद्याला दिसून येणारी सूज ही जू मानेला सतत घासत राहिल्याने होत असते. बैलाला सतत जड शेतीकामांसाठी जुपंल्यास बैलाच्या खांद्याला (bullock hump) सूज आलेली दिसून येते. पावसाळ्यात शेतीची कामे सुरु झाल्यानंतर अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर बैलांना जड कामाला जुंपल्यास त्यांच्या खांद्याला सूज येते. खांद्याला सूज आल्याने बैलांना (Bullock) मान खाली करून चारा खाणे आणि पाणी पिणे अवघड जाते.

खरीपाची कामे सुरु झाली कि, बैलांचा शेतीकामांसाठीचा वापर वाढतो. बैलांच्या खाद्यांवर सतत जू ठेवल्याने त्यांच्या खांद्यांना सूज येत असते. मानेला जू सतत घासल्याने, शेतातील कामे करताना किंवा बैलगाडी ओढताना मानेची कातडी जू आणि मानेच्या खीळ मध्ये चिंगरली जाते. काहीवेळेस जूचा मानेवर असणारा पृष्ठभाग खडबडीत असल्याने खांद्याला जखम होते. परिणामी मानेला इजा होऊन, खांदेसूज होते.

Bullock Hump Swelling Treatment
शेती कामांसाठी बैल जोडीची निवड कशी करावी? | Bullock Pair for Agriculture Work | ॲग्रोवन

काहीवेळेस आपल्याकडे असणारी बैलजोडी ही समान उंचीची नसल्याने देखील, जू समांतर राहत नाही. जू तिरकस ओढला गेल्याने, दोन्ही बैलांना खांदेसुजीचा त्रास सुरु होतो. बैलांकडून जास्त प्रमाणात शेतीची कामे करून घेतल्याने हा आजार होत असतो. खराब रस्त्यावरून अतिरिक्त ओझे लादून बैलगाडी ओढायला लावल्यास त्यांच्या खाद्यांना सूज येते.

Bullock Hump Swelling Treatment
शेतकऱ्यांचा आधुनिक 'इलेक्ट्रीक बैल'

खांदेसुजीच्या प्राथमिक अवस्थेत खांद्याला सूज येते. खांद्याची सूज गरम आणि अत्यंत वेदनादायी असते. यामध्ये खांद्याच्या भागावर सूज येते. जू ओढताना खांद्याची कातडी मागच्या बाजूस जोराने ओढली गेल्याने कातडीखाली पडदा वेगळा होऊन, त्या ठिकाणी रक्त साचते. तरुण वयातील जनावरे आणि सतत ताण असणाऱ्या जनावरांमध्ये खांदेसूज जास्त दिसून येते.

खांदेसुजीचा आकार लिंबाच्या आकारापासून ते कितीही मोठा असू शकतो. सुरुवातीला खांद्यावर लहान-लहान आकराच्या गाठी येतात. पुढे जाऊन या गाठीमुळे कर्करोग होण्याचीही शक्यता असते. खांद्याला सूज आलेली असतानाही बैलाला कामासाठी जुपल्यास त्यांना प्रचंड वेदना होतात.

खांदेसुजीवर उपचार म्हणून सुजलेल्या भागावर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने चार ते पाच दिवस खांद्याची सूज कमी करणारा मलम लावत राहावा. बर्फाने तीन ते चार दिवस सतत शेकवत राहावे. शेकवताना जनावर भाजणार नाही याची काळजी घ्यावी. सूज खूप जुनी असल्यास गरम वाळू कपड्यात गुंडाळून शेक द्यावा.

नुकत्याच झालेल्या खांदेसुजीत सुजलेल्या भागावर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने ४ ते ५ दिवस खांदेसूज कमी करणारा मलम लावून घ्यावा. सूज जास्त असल्यास गरम वाळू कपड्यात गुंडाळून खांद्याला चार ते पाच दिवस शेक द्यावा. खांद्यावरील गाठीमध्ये पू असल्यास, त्यातील पू काढून रोजच्या रोज त्यांचे ड्रेसिंग करून घेतले पाहिजे.

बैलावर उपचार चालू असताना बैलाला कामास जुंपू नये, त्यांना पूर्णपणे आराम द्यावा. औषधोपचाराने जर खांद्यावरील गाठी कमी होत नसतील तर पशुवैद्यकाकडून खांद्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करून त्या काढून टाकाव्यात.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com