तुमच्या वासरासाठी कोणता चारा चांगला?

वासरासाठी चारा व्यवस्थापन करत असताना, कोणत्या प्रकारच्या चाऱ्याचा समावेश केला पाहिजे. वासराची रवंथ क्रिया लवकर सुरुवात होण्यासाठी काफ स्टार्टर जेवढे आवश्यक आहे. तितकाच महत्त्वाचा आहे तो म्हणजे चांगल्या प्रतीचा सुका चारा.
लवकरात लवकर रवंथ प्रक्रिया सुरु होण्यासाठी कालवडीला सहाव्या दिवशी पासून सुका चारा, काल्फ स्टार्टर आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे.
लवकरात लवकर रवंथ प्रक्रिया सुरु होण्यासाठी कालवडीला सहाव्या दिवशी पासून सुका चारा, काल्फ स्टार्टर आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे.

या सुक्या चाऱ्याला इंग्रजीमध्ये ‘हे’ असं म्हणतात. सुक्या चाऱ्यामुळे कोठीपोटाचे भरण होऊन कोठीपोटाचा आकार वाढतो. सुक्या चाऱ्यात तंतुमय पदार्थांचे प्रमाण अधिक असल्याने कोठीपोटाची हालचाल वाढते. कोठीपोटाच्या स्नायूंची कार्यक्षमता वाढते. वासराला दुसऱ्या आठवड्यापासून मेथीघास, बरसीम किंवा इतर प्रथिने असलेले गवत सावलीत सुकवून तयार केलेला सुका चारा द्यावा.

सुक्या चाऱ्याची प्रत -

- हा चारा उच्च प्रतीचा आणि अधिक पाचक घटक असलेला असावा.

- या चाऱ्यात प्रथिनांची टक्केवारी जास्त असली पाहिजे.

- सुक्या चाऱ्याच्या कांड्या या लुसलुशीत असाव्यात, त्यात धुळीचे कण नसावेत.

- चाऱ्याचा रंग आणि चवही चांगली असावी.

- सुका चारा काळा पडलेला किंवा बुरशी लागलेला नसावा.

हे सर्व झाले सुक्या चाऱ्याच पण आपण आपल्या पशुधनाला सुक्या चाऱ्याबरोबर ओला म्हणजे हिरवा चाराही देत असतो.

वासरू चांगल्या प्रकारे रवंथ करू लागल्यावर आणि वासराचे वजन ८० किलो झाल्यावर दूध देण्याचे प्रमाण हळू-हळू कमी करत ते बंद करावे. सोबतच हिरव्या चाऱ्याचे प्रमाण त्याच पटीत वाढवित न्यावे.

हिरवा चारा देत असताना त्यात एकदल आणि द्विदल अशा दोन्ही चाऱ्याचा समावेश करावा. चारा चांगल्या प्रतीचा, अधिक प्रथिने असलेला द्यावा. यामुळे वासराची वाढ जोमाने होण्यास मदत होईल. सहा महिने वयाखालच्या वासराला चुकुनही मुरघास किंवा युरिया प्रक्रिया केलेला चारा खाऊ घालू नये. हा चारा पचविण्याइतपत त्यांच्या कोठीपोटाची वाढ झालेली नसते.

वासराच्या आहारात पुरेशा प्रमाणात सुक्या चाऱ्याचा समवेश करावा. हिरव्या चाऱ्याचे प्रमाण तिसऱ्या आठवड्यापासून अर्धा किलोपासून सुरु करावे. सहाव्या महिन्यात ९ किलोपर्यंत हिरव्या चाऱ्याचे प्रमाण वाढवित न्यावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com