Lumpy Vaccination : खानदेशात लसीकरणासाठी वणवण

खानदेशात जळगावमधील जळगाव, यावल, रावेर, अमळनेर, पारोळा, धुळ्यातील साक्री, शिरपूर, धुळे आदी भागात पशुधनात ‘लम्पी स्कीन’ आजाराची समस्या वाढत आहे.
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon

जळगाव ः खानदेशात जळगावमधील जळगाव, यावल, रावेर, अमळनेर, पारोळा, धुळ्यातील साक्री, शिरपूर, धुळे आदी भागात पशुधनात ‘लम्पी स्कीन’ आजाराची (Lumpy Skin Disease) समस्या वाढत आहे. प्रशासनाने फक्त बाजार बंद (Livestock Market Closed) व पशुधन वाहतूक (Animal Transportation) थांबवून कागदोपत्री उपाययोजना केल्या. पण पशुधनाची हानी सुरूच आहे.

बुधवारी (ता. २१) कानळदा (ता. जळगाव) येथे एका बैलाचा मृत्यू ‘लम्पी स्कीन’मुळे झाला. त्याचा पंचनामा तलाठी रमेश माळी व इतरांनी केला. असेच मृत्यू साक्री, रावेर भागातही बुधवारी झाल्याची माहिती आहे. आजार पसरत आहे. कुठेही त्यासंबंधी औषधोपचार, पशुवैद्यकांकडून पाहणी, मार्गदर्शन सुरू नाही.

Lumpy Skin
Lumpy Skin : स्वतः जगातून गेली पण वासराला जगवलं

जळगाव तालुक्यात ‘लम्पी स्कीन’चे लसीकरण मोजक्याच गावांत झाले आहे. कानळदा व लगतच्या फुपनगरी, खेडी खुर्द, वडनगरी, पिलखेडा, कुवारखेडा, नांद्रा बुद्रूक व इतर भागात तातडीने सर्वेक्षण, लसीकरण, आजारी पशुधनावर उपचार व मार्गदर्शन करण्याची गरज आहे. लसीकरण खानदेशात कुठेही पशुसंवर्धन विभागाकडून सुरू नाही. मात्र, सरपंच, पंचायत समितीचे सदस्य मदत करून किंवा वित्तसाहाय्य करून लसीकरण करून घेत आहेत.

खासगी पशुवैद्यकांचीच मदत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यात अतिपावसात कापसाचे नुकसान झाल्याने दुष्काळात तेरावा, अशी स्थिती आहे. शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात लशी व इतर औषधे नाहीत. कर्मचारीही नसतात.

Lumpy Skin
Lumpy Skin : ‘लम्पी’ लसीकरणासाठी प्रति जनावरामागे २० रुपये आकारणी

पशुवैद्यक दुपारी १२, १ नंतर दवाखान्यात सापडत नाहीत. यामुळे अडचणी आहेत. आजारी पशुधनावर उपचारासाठी शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात जाणे शेतकरी व पशुधनालाही शक्य नसते. तरीदेखील पशुवैद्यक पशुवैद्यकीय दवाखान्यात या, असे सांगत आहेत.

खानदेशात लस मात्रा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी

खानदेशात कुठेही पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण सुरू नाही. मात्र, सरपंच, पंचायत समितीचे सदस्य मदत करून किंवा वित्तसाहाय्य करून लसीकरण करून घेत आहेत. प्रशासन फक्त कागदोपत्री उपाय करीत आहे. मध्यंतरी आजारी पशुधनाची माहिती खासगी पशुवैद्यकांनी द्यावी, असे आदेश प्रशासनाने दिले होते.

परंतु या खासगी पशुवैद्यकांची मदत घेऊन लसीकरण व उपचार, सर्वेक्षण आदी कार्यवाही सुरू झालेली नाही. यामुळे आजार पसरत आहे. गायी व बैल अधिक आजारी आहेत. ताप येणे, कडक फोड खांदा व लगत तयार होणे, अशी समस्या आहे. त्यावर उपचार खासगी पशुवैद्यक करीत आहेत. ते किती प्रभावी व योग्य आहेत, हादेखील मुद्दा आहे. यामुळे आजार वाढत आहे. पण प्रशासन आजार आटोक्यात असल्याची बतावणी सतत करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com