कशी घ्यायची नवजात वासराची काळजी?

वासराचा जन्म झाल्यानंतर सुरुवातीचा एक तास, वासराच्या पुढील आयुष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो
Care of a newborn calf after calving of cow.
Care of a newborn calf after calving of cow.Agrowon

वासराचा (calf) जन्म झाल्यानंतर सुरुवातीचा एक तास, वासराच्या पुढील आयुष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. वासराचा जन्म झाल्यानंतर श्वसनक्रिया सुरु होण्यासाठी वासराचे नाक आणि तोंड निर्जंतुक खरखरीत कापडाने स्वच्छ केले पाहिजे. गाय वासराला चाटत असल्यास, तिला वासरास चाटू द्यावे, जेणेकरून वासराचे रक्ताभिसरण (blood circulation) सुरु होईल. वासराचे कोवळे खुर खुंटून घ्यावेत, जेणेकरून वासरू उभे राहताना अडचण येणार नाही.

वासराची नाळ (naval cord) बेंबीपासून अडीच सेंटीमीटर अंतरावर कापून घ्यावी. नाळ टीक्चर आयोडीनमध्ये ३० सेकंद बुडवावी. वासराला जन्मानंतर एका तासाच्या आत गायीचे चिक पाजावे. वासराच्या वजनाच्या एक दशांश या प्रमाणात दर दोन ते चार तासांच्या अंतराने विभागून चिक पाजावा.

Care of a newborn calf after calving of cow.
म्हशीच्या रेडकांच्या मृत्यूची कारणे आणि उपाययोजना! | Buffalo Calf

दहा दिवसांनी वासराला जंताचा (worm) पहिला डोस द्यावा. वासराची शिंगे नको असल्यास, शिंगनळी २ आठवडे वय असतानाच जाळून टाकावी.

वासरांचे योग्य व्यवस्थापन करत असताना, वासराच्या वजन वाढीचा वेग हा प्रतिदिन ४०० ते ५०० ग्रॅम असला पाहिजे. वासरू सहा महिन्याचे झाल्यानंतर त्याच्या राहण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी. वासरांच्या गोठ्यात खनिज द्रव्यांच्या विटा बांधाव्यात.

Care of a newborn calf after calving of cow.
जाणून घ्या, कालवड संगोपनाची नवी संकल्पना! | cow calf management | ॲग्रोवन

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com