
स्वच्छ दूध उत्पादनामुळे (milk production) दुधाची प्रत चांगली राहण्यास मदत होते. पावसाळ्यात वातावरणातील ओलावा वाढल्याने जीव-जंतूची वाढही मोठ्या प्रमाणात होत असते. दूध जनावरांच्या कासेतून बाहेर आल्यानंतर ते डेअरीला पोहोचेपर्यंत त्यातील जीवाणूंची वाढ मोठ्या संख्येने होत असते.
गायीची धार काढण्याअगोदर गायीला चांगला खरारा करून घ्यावा. कास (udder) स्वच्छ, निर्जंतुक पाण्याने धुऊन घ्यावी. धार काढण्यापूर्वी कास स्वच्छ कापडाने कोरडी करून घ्यावी. धार काढण्याची जागा स्वच्छ आणि निर्जंतुक असल्याची खात्री करून घ्यावी.
धार काढणाऱ्या व्यक्तींचे हात स्वच्छ आणि कोरडे असावेत. त्यांची नखे कापलेली असावीत. दूध हलक्या हाताने मात्र वेगाने काढावे. गायीची धार काढण्याची वेळ शक्यतो बदलू नये. दूध काढण्यासाठी वापरायची भांडी स्वच्छ, कोरड्या आणि निमुळते तोंड असलेल्या भांड्यात काढावी. भांडी शक्यतो स्टेनलेस स्टीलची (Stainless steel) असावी. भांडी धुवून झाल्यानंतर ती कोरडी करण्यासाठी पालथी करून ठेवावीत.
धार काढताना पूर्ण दूध काढून घ्यावे. धार काढण्याची पद्धत योग्य म्हणजे पूर्ण हात पद्धतीने (Full Hand Method) धार काढली पाहिजे. पूर्ण हात पद्धतीमध्ये अंगठा न दुमडता पाचही बोटांत म्हणजे हाताच्या मुठीत गायीचे सड पकडून दाब देऊन धार काढली जाते. यामुळे संपूर्ण कासेवर समान दाब पडतो. जनावराला त्रास न होता दूध काढणे सोपे जाते. ही पद्धत सर्वात जास्त योग्य व सुरक्षित आहे.
जनावरांची दर आठवड्याला मस्टायटीसची (Mastitis) चाचणी करून घ्यावी. धार काढण्यापूर्वी जनावरांची कास व सड स्वच्छ पाण्याने धुऊन कोरडी घ्यावी. कास निर्जंतुक करण्यासाठी सौम्य पोटॅशियम परमॅग्नेटचा वापर करावा.
धार काढणाऱ्या व्यक्तीचे आरोग्य चांगले असावे. धार काढणाऱ्या व्यक्तीचे कपडे स्वच्छ असावेत. हाताची नखे कापलेली असावीत. दूध काढण्यापूर्वी त्या व्यक्तीने हात स्वच्छ धुऊन, कोरडे करून घ्यावेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.