कृत्रिम रेतनासाठी वळूची निवड कशी कराल?

कालवड पहिल्यांदा वयात आल्यानंतर पहिल्याच माजात कालवडीला भरवून घेऊ नये. त्यातील दुसऱ्या किंवा तिसऱ्या माजाला कालवडीला भरून घेतल्यास गर्भधारणेची शक्यता वाढते.
Artificial Insemination in animals
Artificial Insemination in animalsAgrowon

कालवड (heifer) पहिल्यांदा वयात आल्यानंतर पहिल्याच माजात कालवडीला भरवून घेऊ नये. कारण हा सुरुवातीचा माज (heat) वांझोटा असण्याचे प्रमाण जास्त असते. कालवड वयात आल्यानंतर २१ दिवसाचे माजाचे (heat cycle) चक्र सुरु होते. त्यातील दुसऱ्या किंवा तिसऱ्या माजाला कालवडीला भरून घेतल्यास गर्भधारणेची शक्यता वाढते. कृत्रिम रेतन (artificial insemination) करण्यापूर्वी कालवडीची प्रजनन संस्था तपासून घ्यावी. कृत्रिमरित्या कालवडीला भरवून घेण्यासाठी पशुवैद्यकाला (veterinary doctor) गोठ्यावर बोलवून घ्यावे.

कालवडीला भरवून घेताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. कृत्रिम रेतन करण्यापूर्वी कालवडीचा पाठीमागील भाग स्वच्छ पाण्याने धुऊन स्वच्छ फडक्याने कोरडा करून घ्यावा. कालवडीचे कृत्रिम रेतन करताना तिच्याच वंशावळीतील वळूचा वापर करू नये, यामुळे इनब्रीडिंग टाळता येईल. एकाच वंशावळीतील म्हणजे कोणत्याही कालवडीच्या मागील तीन ते पाच पिढ्यातील बैलाचा वापर करून नये.

Artificial Insemination in animals
कालवड संगोपनात वजनवाढ महत्त्वाची! । Kalvad Sangopan । Heifer Rearing

कृत्रिम रेतन करताना कालवडीला तिच्याच जातीच्या वळूची रेतमात्रा वापरावी. म्हणजे होलस्टीन फ्रिजीयन गायीला एच. एफ. जातीच्या बैलानेच भरवून घ्यावी. कोणत्याही भिन्न जातीच्या वळूची रेतमात्रा वापरताना तज्ज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. कृत्रिम रेतनासाठी वापरल्या जाणाऱ्या वळूच्या आईची दूध उत्पादनक्षमता कालवडीच्या आईच्या दूध उत्पादन क्षमतेपेक्षा अधिक असावी

Artificial Insemination in animals
कालवड भरविण्याचे योग्य वय कोणते ?

कालवडीची शरीर रचना लक्षात घेऊन त्यात काही सुधारणा करायची असल्यास त्यानुसारच वळूची निवड करावी. एका वेळेस जास्तीत-जास्त तीन शारीरिक किंवा अनुवंशिक सुधारणा पुढील नेण्याचा प्रयत्न करावा. साधारणपणे कालवडीचा माजाचा कालावधी हा १८ ते २४ तासांचा असतो. कालवडीच्या माजाच्या मध्यात म्हणजे पक्क्या माजाच्या काळात कृत्रिम रेतन करून घ्यावे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com