Animal Care
Animal CareAgrowon

Animal Care : श्रेणी एक पशुवैद्यकीय दवाखाना असूनही खोळंबा..!

नाशिक- औरंगाबाद या महामार्गावरील नैताळे येथे २००२ पासून श्रेणी-१ चा पशुवैद्यकीय दवाखाना आहे. अनेक महिन्यांपासून येथे निवासी व कायम स्वरूपाचे पशुवैद्यकीय अधिकारी नाही.

नैताळे ः नाशिक- औरंगाबाद या महामार्गावरील नैताळे येथे २००२ पासून श्रेणी-१ चा पशुवैद्यकीय दवाखाना (Veterinary Clinic) आहे. अनेक महिन्यांपासून येथे निवासी व कायम स्वरूपाचे पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officials) नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींनी अनेकवेळा तालुका व जिल्हा पातळीवरील प्रश्‍न मांडूनही अद्यापपर्यंत तो तसाच आहे.

Animal Care
Animal Care : वाढवा जनावरांची रोगप्रतिकारशक्ती...

शासनाने तातडीने येथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती न केल्यास कोणत्याही क्षणी दवाखान्याला कुलूप लावले जाईल किंवा रास्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशारा शेतकऱ्यांतर्फे राजेंद्र बोरगुडे, शिवाजी बोरगुडे, दत्तू भवर, देविदास बोरगुडे, जगन पाठक, सोपान बोरगुडे यांनी दिला आहेत.

Animal Care
Animal Care : जनावरांना कसा होतो किटोसिस आजार?

नैताळे येथे श्रेणी- १ चा पशुवैद्यकीय दवाखाना असणे म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने गावाला एक देणगीच आहेत. अनेक कुशल पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी येथे सेवा दिली आहे, पण गेल्या अनेक महिन्यांपासून येथे कायमस्वरूपी व निवासी पशुवैद्यकीय अधिकारी नाही, त्यामुळे पशुपालकांची गैरसोय होत आहे. आमदार दिलीपराव बनकर यांनी या गोष्टीकडे तातडीने लक्ष देऊन शासन नियुक्त पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणुकीविषयी प्रयत्न करावा अशी मागणी होत आहे

शासनस्तरावरुन रिक्त जागेवर नव्याने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही. असे असले तरी तात्पुरत्या स्वरुपात आपण वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करु शकतो. या बाबत तातडीने निर्णय होऊ शकतो.
डॉ. सुनील आहिरे, निफाड तालुका पशुवैद्यकीय अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com