Animal Care : जंतनाशकांप्रती प्रतिरोध होण्याची कारणे, उपाय

जनावरांना साधारणपणे तीन प्रकारच्या कृमींचा (जंत) प्रादुर्भाव होतो. गोलकृमी (आतड्यांमध्ये वास्तव्य), पर्णकृमी (वेगवेगळे अवयव आणि पोटामध्ये वास्तव्य) आणि पट्टकृमी (आतडे आणि कृमीच्या अर्भक अवस्था शरीरातील इतर भागांमध्ये वास्तव्य) यांचा समावेश होतो.
Deworming in cow
Deworming in cowAgrowon

जनावरांना साधारणपणे तीन प्रकारच्या कृमींचा (Worm) (जंत) प्रादुर्भाव होतो. गोलकृमी (आतड्यांमध्ये वास्तव्य), पर्णकृमी (वेगवेगळे अवयव आणि पोटामध्ये वास्तव्य) आणि पट्टकृमी (आतडे आणि कृमीच्या अर्भक अवस्था शरीरातील इतर भागांमध्ये वास्तव्य) यांचा समावेश होतो. वैज्ञानिक भाषेत कोणतेही रासायनिक किंवा वनस्पतिजन्य घटक दिल्यानंतर आतड्यातील कृमींना पक्षाघात होऊन ते शरीराबाहेर फेकले जातात, अशा सर्व प्रकारच्या औषधास जंतनाशक (Deworming) असे म्हणतात.

Deworming in cow
पावसाळ्यात जनावरांना हे आजार होऊ नये म्हणून काय करावे? | Animal Diseases in rainy season | ॲग्रोवन

जनावरांना नियमितपणे दिल्या जाणाऱ्या जंतनाशकांच्या मात्रेस ‘डीवर्मिंग’ असेही संबोधले जाते. पशुपालक पशुधनामध्ये नियमितपणे सर्व वयोगटातील गायी, म्हशी, वासरे, कालवडी आणि शेळ्या-मेढ्यांमध्ये डीवर्मिंग करतात.

तज्ज्ञांचा सल्ला न घेता जंतनाशकांची मात्रा कमी जास्त प्रमाणात दिल्यामुळे ठरावीक जंतनाशकांचे योग्य परिणाम मिळत नाहीत. परिणामी, जंतांमध्ये जंतनाशकाप्रती प्रतिरोध निर्माण होतो.

जंतनाशकाप्रती प्रतिरोध निर्माण झाल्यामुळे जंतनाशकांची ठरावीक मात्रा देऊनही जंतावर कोणताही परिणाम होत नाही. तसेच जंत किंवा कृमींच्या पुढच्या पिढीमध्ये ठराविक जंतनाशकासाठी प्रतिरोध परावर्तित होतो. त्यामुळे प्रभावी जंतनिर्मूलन शक्य होत नाही.

Deworming in cow
पुरात पशुधन वाहून गेल्यास पशुपालकांवर कारवाई

प्रतिरोध निर्माण होण्याची कारणे

जंतांच्या प्रजातीची योग्य माहिती न घेता कोणत्याही जंतनाशकाची कमी जास्त प्रमाणात मात्रा देणे.

जंतनाशकाची निवड करताना पशुवैद्यक तज्ज्ञांचा सल्ला न घेणे.

वारंवार एकाच जंतनाशकाचा वापर करणे.

जनावरांच्या विष्टेच्या नमुन्यांची तपासणी न करता जंतनाशक औषधाची मात्रा देणे.

जंतनाशकाप्रती प्रतिरोध निर्माण झाल्यामुळे होणारे नुकसान

जंतावर योग्य औषधोपचार करणे शक्य होत नाही. परिणामी, जंत रक्त आणि अन्नशोषण करतात. त्यामुळे पशुधनाची शरीर प्रकृती खालावते.

जंतनाशक प्रभावीपणे काम न केल्यामुळे पैसा आणि श्रम व्यर्थ जातात.

जंताच्या प्रादुर्भावामुळे जनावराच्या शरीरस्वास्थाचा ऱ्हास, दुग्धोत्पादन आणि वजनातील घट, पुनरुत्पादनावर परिणाम संभवतात.

प्रभावी उपाय

जंतनाशकाचे वेळापत्रक (डीवर्मिंग शेड्यूल) साचेबंद पद्धतीने बनविलेले नसावे. पशुधनाचा प्रकार, संभाव्य जंताच्या प्रजातींची लागण, ऋतुमान, पावसाळा सुरू होण्याचा हंगाम आणि स्थानिक वातावरणातील बदल या सर्व बाबींचा विचार करून विशिष्ट भौगोलिक परिस्थितीला लागू होणारे त्या वर्षापुरते जंतनाशकाचे वेळापत्रक बनवून त्याची अंमलबजावणी करावी. हे वेळापत्रक गाय, म्हैस, शेळी मेंढी या सर्वांसाठी भिन्न असावे.

जंतनाशक देण्यापूर्वी कळपातील किमान १० टक्के जनावरांच्या विष्टेचे नमुने पशुवैद्यक तज्ज्ञांकडून तपासून घ्यावेत. तपासणी केल्यामुळे कोणत्या प्रजातींच्या जंताची, किती प्रमाणात लागण झाली हे समजते. त्यानुसार जंतनाशक देण्याची गरज आहे का, हा निर्णय घेणे शक्य होते.

एकच जंतनाशक सतत वापरू नये. तसेच जंतनाशकाची मात्रा कमी किंवा जास्त प्रमाणात देऊ नये.

जंताचे प्रमाण कमी होण्यासाठी आणि त्यांची लागण होणार नाही, यासाठी उपाययोजना कराव्यात. जसे की चरावयाच्या वेळेतील बदल, चरायला सोडताना पेडकावर करावयाचे व्यवस्थापन इत्यादी.

- डॉ. बाबासाहेब नरळदकर, ८९९९१३३३६३ (परोपजीविशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com