लसीकरण केल्यानंतर जनावरांच्या शरीरात होतात हे बदल! |

बदलत्या वातावरणाचा जनावरांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण महत्त्वाचे आहे.
Vaccination
VaccinationAgrowon

बदलत्या ऋतुमानानुसार वातावरणात बदल होत असतात. या बदलत्या वातावरणाचा जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसतो. या बदलाचा परिणाम कमी करण्यासाठी जनावरांना (animals) या बदलासाठी तयार करून ठेवणे गरजेचं आहे. त्यासाठी जनावरांचे मान्सूनपूर्व लसीकरण (Vaccination) महत्त्वाचं आहे.

आपण आपल्या जनावरांचे लसीकरण करतो म्हणजे ज्या रोगाचे लसीकरण आपल्याला करायचे आहे ते रोगजंतु म्हणजे मृत जीवाणू (Bacteria) किंवा विषाणू (Virus) जनावरांच्या शरीरात सोडले जातात. शरीरात सोडल्यानंतर शरीरातील पांढऱ्या पेशी या रोगजंतुकडे आकर्षित होतात. पांढऱ्या पेशी स्वतःवर हल्ला झालाय, असं समजून त्या विशिष्ट रोगजंतूंना नष्ट करतात. मुळातच हे रोगजंतू मृत असल्याने त्याचा जनावरांच्या शरीरावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. परंतु या पांढऱ्या पेशींमध्ये विशिष्ट रोगजंतु नष्ट केल्याची स्मरणशक्ती निर्माण होते. त्यामुळे जेव्हा प्रत्यक्षात हे रोगजंतु शरीरात प्रवेश करतात तेव्हा पांढऱ्या पेशीमध्ये त्यांना नष्ट करण्याची ताकद असते.

Vaccination
जनावरांचे मान्सूनपूर्व लसीकरण का करावे?

पशुधनाचे लसीकरण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लसीचे दोन प्रकार येतात. पहिला म्हणजे जिवंत लस ज्यात जिवंत जीवाणू शरीरात सोडले जातात. दुसरा म्हणजे मृत लस ज्यात मृत किंवा अर्धमेले जीवाणू शरीरात सोडले जातात.

Vaccination
मान्सूनपूर्व लसीकरण करा, पशुधन वाचवा! | Before Monsoon Vaccination Drive of cow | ॲग्रोवन

जनावरांना होणारे बहुतांश आजार हे जीवाणू आणि विषाणूमुळे होत असतात. या रोगांची बाधा होऊन, जनावरे दगाऊ नये म्हणून, जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण गरजेचं आहे. पावसाळ्यात वातावरणातील बदलामुळे जनावरांची प्रतिकारशक्ती कमी होत असते. आहारातून प्रथिनांचा योग्य प्रमाणात पुरवठा न झाल्यास जनावरांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. मान्सूनमध्ये मोठ्या जनावरांना फऱ्या, घटसर्प तसेच शेळ्या-मेंढ्यामध्ये आंत्रविषार यांसारखे प्राणघातक आजार होत असतात. लसीकरण केल्याने जनावरांचे या आजारापासून संरक्षण होऊ शकते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com