Lumpy Skin Disease : अकोल्यातील लंपीच्या प्रादुर्भावाची आयुक्तांकडून दखल

जिल्ह्यात दौरा करून घेतला आढावा
Lumpy Skin Disease
Lumpy Skin DiseaseAgrowon

अकोला ः जिल्ह्यात लंपकी स्कीन आजाराचा (Lumpy Skin Disease) प्रादुर्भाव जनावरांमध्ये सातत्याने वाढत आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पशुसंवर्धन खात्याचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी भेटी देऊन उपाययोजना करण्याबाबत यंत्रणांना सूचना केली.

Lumpy Skin Disease
Animal Care : काय आहेत लंपी त्वचा रोगाची लक्षणे ?

सचिंद्र प्रतापसिंह यांनी अकोट तालुक्यात भेट देऊन उपाययोजनांबाबत आढावा घेतला. रोग नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देशही दिले. जनावरांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव अकोला व अकोट तालुक्यात आढळून आलेला आहे. निपाणा येथील नमुना पॉझिटिव्ह आल्यानंतर जिल्ह्यातील यंत्रणा खडबडून जागी झाली होती. त्यानंतर जेथे हा प्रादुर्भाव दिसून आला तेथपासून १० किलोमीटर परिसरातील जनावरांची खरेदी-विक्री, वाहतूक बंद करण्यात आली. त्यानंतर तेथे जनावरांचे लसीकरणही सुरू करण्यात आले. अकोट तालुक्यातही उद्रेक सुरू झाला. याची दखल घेत पशुसंवर्धन आयुक्तांनी जिल्ह्याचा दौरा केला.

पशुसंवर्धन आयुक्तांनी सुरुवातीला त्यांनी अकोल्यात आढावा बैठक घेतली. या वेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. गजानन दळवी, सहायक आयुक्त डॉ. तुषार बावणे, डॉ. राठोड आदी उपस्थित होते.
आढावा बैठकीनंतर पशुसंवर्धन आयुक्तांनी अकोट तालुक्यातील लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयाला भेट देऊन तालुक्यातील लंपी स्कीन आजारावरील उपायांचा आढावा घेतला. या वेळी अकोट तालुक्यातील ७१९३ जनावरांना प्रतिबंधक लसीकरण तसेच २७४ गोठ्यांमध्ये फवारणी केली असल्याची माहिती देण्यात आली. शिवपूर (कासोद) व जितापूर रूपागड या गावांना भेट देऊन पशुपालकांसोबत संवाद साधला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com