Animal Care: जनावरांतील ब्रुसेलोसिस आजाराचे नियंत्रण

हा ब्रुसेलाच्या विविध प्रजातीमुळे होणारा सांसर्गिक जिवाणूजन्य आजार आहे. हा आजार प्रामुख्याने गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळी, मेंढी आणि श्वान यांच्यामध्ये संक्रमित होतो.
Animal Care
Animal CareAgrowon

सूरज नेहरकर, डॉ. मीरा साखरे

ब्रुसेलोसिस (brucellosis) म्हणजेच सांसर्गिक गर्भपात. हा ब्रुसेलाच्या विविध प्रजातीमुळे होणारा सांसर्गिक जिवाणूजन्य आजार आहे. हा आजार प्रामुख्याने गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळी, मेंढी आणि श्वान यांच्यामध्ये संक्रमित होतो.

ब्रुसेलोसिस आजार जनावरांतून माणसामध्ये संक्रमित होतो.

प्रादुर्भावाचा परिणामः

१) गाभण काळाच्या शेवटच्या टप्यात गर्भपात झाल्यामुळे वासरू दगावते.

२) बाधित जनावरात दूध उत्पादन घटते. दोन वेतातील अंतर वाढते. बाधित जनावर गाभण राहत नाही. किंवा गाभण राहिल्यास वारंवार गाभडते.

३) प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वांझपणा येऊ शकतो.

४) चाऱ्यावरील खर्च वाढतो.

आजाराचा प्रसार :

१) गाय, म्हैस, शेळी, मेंढी यांच्या बाधित गर्भ, गर्भाशयाचा स्राव, नाळ, वार यांच्या संपर्कात निरोगी जनावर आल्यास संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

२) दूषित चारा, पाणी यातून प्रसार होतो. रेतनासाठी वापरलेला वळू, बोकड यांच्या वीर्यातून प्रादुर्भाव होऊ शकतो.

३) संक्रमित जनावरांच्या संपर्कात आल्यावर श्‍वसनावाटे जिवाणू शरिरात प्रवेश करू शकतात.

४) माणसांमध्ये कच्चे मांस, कच्चे दूध सेवन केल्यावर प्रसार होतो.

५) जनावरांच्या सतत संपर्कात येणारे पशुतज्ज्ञ, कर्मचारी, प्रयोगशाळेतील काम करणारे व्यक्ती, तसेच व्यावसायिक यांच्यामध्ये आजार संक्रमित होऊ शकतो.

Animal Care
Animal Care : फिरत्या पशुचिकित्‍सालयाद्वारे दररोज २ हजार पशुधनाची तपासणी

जनावरांतील लक्षणे :

१) गाय, म्हशीत ६ ते ८ महिन्यांचा काळ आणि शेळी, मेंढीमध्ये ४ ते ५ महिन्यांच्या गाभण काळात अचानक गर्भपात झालेला दिसून येतो.

२) हा सांसर्गिक आजार असल्यामुळे एकाच वेळेस गाभण असलेल्या जनावरांत गर्भपात होऊ शकतो.

Animal Care
Animal Care : कसा असावा दुभत्या जनावरांचा आहार?

३) काही गाभण जनावरांत गर्भपात न झाल्यास, प्रसूती व्यवस्थित होते परंतु प्रसूतीनंतर जार अडकणे, गर्भाशयाचा संसर्ग होणे, कासदाह होतो.

४) अशक्त वासरू जन्मते. नर प्राण्यात अंडाकोशावर सूज येते. वीर्यात जिवाणूंचा संसर्ग होतो.

५) माणसातील लक्षणे ः हलका ताप येणे, थंडी, डोकेदुखी, अंग दुखणे, आळस येणे, भूक न लागणे, वजन कमी होते, सांधे दुखणे, पोटामध्ये वेदना होणे.

आजाराचे निदान:

१) बाधित जनावराचे रक्त, रक्तजल, गर्भाशयाचा स्त्राव, गर्भाशयाचे अवयव, जार, यापैकी योग्य निदानासाठी प्रयोगशाळेत द्यावे.

२) वर्षातून दोनदा प्रौढ जनावरांची रक्तजल तपासणी करावी.

नियंत्रण :

१) आजार एकदा कळपात आल्यावर दिर्घकाळ टिकून राहतो. गर्भपात झालेल्या जनावरास वेगळे ठेवावे आणि उपचार करावा.

२) गर्भपात झालेल्या जनावरांचे गर्भ, जार, स्राव, दूषित चारा दूर खोल खड्डात गोठ्यापासून दूर पुरावा. त्यावर चुन्याची पावडर टाकावी.

३) नवीन खरेदी केलेल्या जनावरांची रक्तजल चाचणी करावी.

४) कळपात रेतनासाठी वापरलेले वळू, बोकड वारंवार बदलू नये.

५) बाधित क्षेत्रामध्येच ब्रुसेलोसिस आजाराचे लसीकरण पशुतज्ज्ञाच्या सल्ल्याने करावे.

६) कच्चे दूध सेवन करणे टाळावे.

७) पशू प्रयोगशाळेत काम करताना योग्य काळजी घ्यावी.

संपर्कः डॉ. मीरा साखरे, ९४२३७५९४९०

(पशुवैद्यकीय रोगप्रतिबंधक शास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com