अशी ओळखा गायीची गर्भधारणा!

अल्ट्रासोनोग्राफी तंत्रज्ञानाचा वापर करून गर्भधारणा आणि प्रजननाशी संबंधित इतर समस्या कमीत कमी वेळेत ओळखता येणे शक्य झाले आहे.
 ultrasonography in cow
ultrasonography in cow Agrowon

पशुपालन व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी पशुपालकांना जास्तीत जास्त वेत हे गायीकडून मिळाले पाहिजेत. याचाच अर्थ गायीने वर्षाला एक आणि म्हशीने १५ महिन्याला एक वासरू (calf) दिले पाहिजे. तसेच गाय व्यायल्यानंतर कमीत कमी ४५ ते ६० दिवसांपर्यत पुन्हा माजाची लक्षणे दाखविली पाहिजेत. ९० ते १२० दिवसांत पुन्हा गाभण (pregnant) राहणेही महत्त्वाचे आहे. परंतु सध्या अनेक कारणामुळे गाय किंवा म्हैस वेळेवर गाभण राहून वर्षाला एक वासरू मिळणे दुरापास्त होऊ लागले आहे.

गायीला भरविल्यानंतर यशस्वी गर्भधारणा झाल्याची खात्री करण्यासाठी कमीत कमी तीन महिन्याचा कालावधी जावा लागतो. परंतु अल्ट्रासोनोग्राफी (ultrasonography) तंत्रज्ञानाचा वापर करून गर्भधारणा आणि प्रजननाशी संबंधित इतर समस्या कमीत कमी वेळेत ओळखता येणे शक्य झाले आहे.

 ultrasonography in cow
गाय-म्हैस एकाच रेतनात गाभण राहण्यासाठी महत्वाच्या गोष्टी | Artificial Insemination | ॲग्रोवन

गर्भधारणेचे अचूक निदान-

गायीला कृत्रिम रित्या भरविल्यानंतर किंवा नैसर्गिक संभोगानंतर तीन महिन्यानंतर यशस्वी गर्भधारणा झाली आहे की नाही हे तपासले जाते. परंतु काही तज्ज्ञ पशुपालक दीड ते दोन महिन्यांनी यशस्वी गर्भधारणेचे निदान करू शकतात. त्याही पलीकडे जाऊन अल्ट्रासोनोग्राफी तंत्रज्ञानाचा वापर तीस दिवसांनंतर गर्भधारणेचे यशस्वी निदान करता येते. या मशीनद्वारे गर्भ, गर्भाशयाची हालचाल ओळखता येते. गर्भधारणा न झालेली गाय पुढे किती दिवसांनी माजावर येईल, याचेही निदान करता येते.

 ultrasonography in cow
गाय आटवताना घ्यायची काळजी

गर्भाशयाच्या आजाराचे निदान-

गायीच्या गर्भाशयाचे आरोग्य निरोगी असणे हे गर्भधारणेसाठी आणि गर्भाच्या वाढीसाठी अत्यंत गरजेचे असते. गर्भाशयात पू किंवा पाणी साचणे, गर्भाची वाढ न होणे, गर्भाशयाचा कर्करोग यांसारख्या रोगाचे निदान या यंत्राद्वारे करता येते. पशुपालक योग्य वेळी आजाराचे निदान करून, योग्य तो उपचार करून घेऊ शकतात.

अल्ट्रासोनोग्राफी मशीनचा वापर जनावरांची प्रजननक्षमता वाढविण्यासाठी गरजेचा होत आहे. या मशिनच्या वापरामुळे जनावरांची प्रजननाची क्षमता चांगली राहून, पशुपालन व्यवसायात वर्षाला एका वासराची संकल्पना अस्तित्वात येऊ शकते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com