एका गायीला लागते इतकी जागा !
cow seating arrangement in shed Agrowon

एका गायीला लागते इतकी जागा !

गायीला बंदिस्त गोठ्यात लागणारी जागा आणि मुक्त संचार गोठ्यात लागणाऱ्या जागेचं प्रमाण वेग-वेगळं असते.

गायीला बंदिस्त गोठ्यात लागणारी जागा आणि मुक्त संचार गोठ्यात (Loose housing system) लागणाऱ्या जागेचं प्रमाण वेग-वेगळं असते. गायीचे वय, तिची शारीरिक अवस्था यानुसार तिची जागेची गरज बदलत असते. मुळातच एका गोठ्यात जास्तीत जास्त किती जनावरे ठेवली पाहिजेत? याचं देखील प्रमाण ठरलेलं असते.

गोठ्यामध्ये जनावरांसाठी स्टॅंडिंग (standing) क्षेत्र असते. स्टॅंडिंग क्षेत्र म्हणजे गाय चारा खाण्याच्या वेळी उभी राहण्याची जागा. जनावर उभे राहण्याची जागा कोरडी असणे अत्यंत गरजेचं आहे. तसेच ही जागा निसरडीही नसावी. या ठिकाणी सूर्यप्रकाशाची किरणे पोहोचतील असे गोठ्याचे बांधकाम असले पाहिजे. जनावरे बसण्याच्या जागी सिमेंटचा कोबा असल्यास, तो ओला होऊन जनावरे घसरणार नाही याची काळजी घ्यावी.

cow seating arrangement  in shed
कमी खर्चातील मुक्त संचार गोठा

जनावरे बसण्याची जागा ज्याला इंग्रजीमध्ये पेडॉक (pedock) म्हंटल जातं. जनावरे गोठ्यात बसण्याची जागा मऊ आणि कोरडी असली पाहिजे. जितका जास्त वेळ जनावरे बसतात तितका वेळ रवंथ (rumination) करण्याचे प्रमाण वाढते. परिणामी दूध उत्पादनात (milk production) वाढ दिसून येते. जनावरे बसण्याच्या जागेवर गव्हाणीतील उरलेला चारा, पेंढा, भुसा पसरवून ठेवावा. गोठ्यात एका महिन्याच्या अंतराने चुना मारून घ्यावा. म्हणजे गोठा निर्जंतुक तसेच कोरडा राहण्यासही मदत होईल. या सोबतच गोठ्यात ई-एम द्रावणाची (EM- Solution) म्हणजे उपयुक्त सुक्ष्मजीवाणुची फवारणी करून घ्यावी.

cow seating arrangement  in shed
शेळ्यांचा गोठा कसा असावा?

बंदिस्त गोठ्यात गायीला ३.५ चौरस मीटर तर म्हशीला ४ चौरस मीटर जागेची गरज असते. याउलट मुक्त संचार गोठ्यात एका गायीला जवळपास १५० ते २०० चौरस मीटर जागा लागते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com