Cow Urine : गोमूत्र मानवी आरोग्यासाठी घातक

आयव्हीआरआय संशोधन संस्थेने केलेल्या संशोधनाचे काय आहेत निष्कर्ष?
Cow Urine
Cow UrineAgrowon

हिंदू संस्कृतीमध्ये गायीला अनन्यसाधारण महत्व आहे. जसं गायीला महत्वाचं स्थान आहे तसेच गोमुत्रालाही (Cow Urine) महत्व आहे. ताजे गोमूत्र अत्यंत पवित्र मानत अनेक धार्मिक कार्यात गोमुत्राचा वापर केला जातो. घरात एखादं शुभकार्य असल्यास गोमूत्र शिंपडलं जातं.

आयुर्वेदाचा संदर्भ देऊन अनेक आजारांवर गोमूत्र फायदेशिर मानून गोमूत्रातच सेवन केले जातं. याशिवाय सेंद्रिय शेतीतही कीड, रोड नियंत्रण आणि जमीन सुपीकतेसाठी गोमुत्राचा वापर होतो.

मात्र हे गोमूत्र मानवी आरोग्यासाठी हानीकारक असल्याचे उत्तरप्रदेश, बरेली येथील इंडियन व्हेटर्नरी रिसर्च इन्स्टिट्यूट (आयव्हीआरआय) (IVRI) या देशातील प्रमुख प्राणी संशोधन संस्थेने केलेल्या संशोधनात समोर आले आहे.

गोमुत्रात मानवी आरोग्यासाठी हानीकारक बॅक्टेरिया असल्यामुळे हे बॅक्टेरिया (Bacteria) मनुष्यासाठी धोकादायक ठरू शकतात असा धक्कादायक निष्कर्ष या संस्थेने काढला आहे. 

आयव्हीआरआय संस्थेत भोजराज सिंह यांच्या नेतृत्वाखाली पीएचडीच्या तीन विद्यार्थ्यांनी गोमूत्राचा मानवावर काय परिणाम होतो या बाबत संशोधन केले.

संशोधनासाठी स्थानिक डेअरी फार्ममधून साहीवाल, थारपारकर या देशी आणि विंदावाणी या संकरित जातीच्या गायीचे गोमुत्र आणि म्हैस आणि मानवाच्या मुत्राचे नमुने गोळा केले.

जून ते नोव्हेंबर २०२२ दरम्यान केलेल्या संशोधनानूसार निरोगी गायी आणि बैलांच्या लघवीच्या नमुन्यांमध्ये कमीतकमी १४ प्रकारचे हानिकारक जीवाणू अढळले, ज्यामध्ये एस्चेरिचिया कोलाईचा समावेश आहे, या जिवाणूमुळे पोटात संसर्ग होऊन मानवाला गंभीर आजाराचा सामना करावा लागू शकतो.

Cow Urine
Mangur Fish : मानवी आरोग्याला घातक मागूर माशांचा साठा जप्त

या संशोधनाचे निष्कर्ष रिसर्चगेट या संशोधन संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, भारतीय बाजारपेठेत अनेक पुरवठादारांकडून गोमूत्र मोठ्या प्रमाणावर भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ट्रेडमार्कशिवाय विकले जाते. 

आयव्हीआरआयच्या एपिडेमिओलॉजी विभागाच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनूसार म्हैस आणि मानवी मूत्राच्या एकूण ७३ नमुन्यांचे विश्लेषण केल्यानंतर असे आढळले की म्हशीच्या मूत्रात गोमूत्रापेक्षा बॅक्टेरिया ला रोखण्याची क्षमता जास्त आहे.

डिस्टिल्ड म्हणजेच शुद्ध केलेल्या गोमूत्रामध्ये संसर्गजन्य बॅक्टेरिया नसतात असा काही लोकांचा समज आहे.  त्यावर अधिक संशोधन केले जात आहे.

मी गेल्या २५ वर्षांपासून गोमूत्रावर संशोधन करत आहे. डिस्टिल्ड गोमूत्र मानवाची प्रतिकारशक्ती वाढवते.  डिस्टिल्ड गोमुत्रात  असे गोमूत्र कर्करोग आणि कोव्हिड सारख्या आजारावर फायदेशिर ठरु शकते.

मात्र हे संशोधन डिस्टिल्ड मुत्राच्या नमुन्यांवर केले नाही. अशी माहिती आयव्हीआरआयचे माजी संचालक आर. एस. चौहान यांनी दिली. त्यामुळे सध्या तरी कोणत्याही मुत्राची सेवनासाठी शिफारस केली जाऊ शकत नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com