दूध का खराब होते?

धार काढल्यानंतर दूध, डेअरीला पोहोचेपर्यंत दुधाची गुणवत्ता टिकवून राहणे गरजेचं आहे. दूध टिकून राहण्याची क्षमता दुधातील सुक्ष्मजंतुंच्या संख्येवर अवलंबून असते.
Dairy Industry in India - Problems, challenges faced by dairy farmers.
Dairy Industry in India - Problems, challenges faced by dairy farmers.Agrowon

धार काढल्यानंतर दूध, डेअरीला पोहोचेपर्यंत दुधाची गुणवत्ता टिकवून राहणे गरजेचं आहे. दूध (milk) टिकून राहण्याची क्षमता दुधातील सुक्ष्मजंतुंच्या (micro-organisam) संख्येवर अवलंबून असते. धार काढल्यानंतर ते ताबडतोड थंड केल्यास, त्यातील जीवाणूंच्या वाढीस अटकाव घालता येऊ शकतो.

दुधाची टिकवणक्षमता वाढविण्यासाठी येणाऱ्या समस्या

दूध काढण्याची अस्वच्छ पद्धत, तापमानातील बदल, शीतकरणाच्या साधनाची कमतरता, धार काढणाऱ्या व्यक्तींची अस्वच्छता यासांरख्या कारणांमुळे दुधामध्ये सुक्ष्मजंतूंची वाढ झपाट्याने होत असते. यामुळे दूध खराब होण्याची दाट शक्यता असते.

Dairy Industry in India - Problems, challenges faced by dairy farmers.
उष्ण वातावरणात टिकून राहणारी म्हैस | Purnathadi Buffalo | ॲग्रोवन

दूध संकलन केंद्र आणि दूध प्रक्रिया केंद्र यातील अंतर बरेचदा जास्त असते. उत्पादित केलेलं दूध शहराकडे पाठविण्यासाठी विविध अडचणी येत असतात. पर्यायी वाहतुकीचे मार्ग उपलब्ध नसणे, वाहतुकीचे अंतर जास्त असणे या सर्व गोष्टींमुळे लहान किंवा मध्यम शेतकऱ्यांकडे उत्पादित होणारे दूध शहरांकडे पाठविण्यास विलंब होतो.

आपल्याकडील शेतकरी जनावरांची धार साधारणपणे दिवसातून दोन वेळा काढत असतात. मात्र काहीवेळेस डेअरीला पोहोचवललेलं दूध एकाच वेळेस वाहतूक करून प्रक्रिया केंद्राकडे पाठविले जाते. शीतकरणाच्या योग्य सोयी नसल्यास, दूध नासण्याची प्रक्रिया सुरु होते.

दूध टिकविण्यातील समस्या सोडविण्यासाठी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाणे दूध थंड करण्यासाठी एक अतिशय स्वस्त सुलभ असा शीतकक्ष तयार केलाय. या शीतकरणासाठी वीज, पेट्रोल, केरोसीन, डिझेल अशा कोणत्याही प्रकारच्या ऊर्जेची आवश्यकता नाही.

सामान्य वातावरणात २० ते ४० अंश सेल्सिअस तापमानाला दुधातल्या जिवाणूंची वाढ झपाट्याने होत असते. दुधामध्ये सूक्ष्म जिवाणूंची संख्या वाढल्यामुळे दूध नासण्यास सुरवात होते. जिवाणूंची संख्या वाढू नये म्हणून दुधाची ५ अंश सेल्सिअस तापमानाला साठवणूक करणे गरजेची आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com