Agri Business News : देशी गोवंशाचे शेण, मूत्र ठरू शकेल आर्थिक स्त्रोत!

Desi Cow Dung : देशी गाईच्या दुधाबरोबरीने शेण, गोमूत्र हे आर्थिक उत्पन्न देऊ शकते, असे गृहितक मांडले जाते. या गोष्टीला शास्त्रीय आणि अर्थशास्त्रीय आधार असावा लागतो.
Desi Cow
Desi CowAgrowon

Desi Cow Rearing : देशी गाईच्या दुधाबरोबरीने शेण, गोमूत्र हे आर्थिक उत्पन्न देऊ शकते, असे गृहितक मांडले जाते. या गोष्टीला शास्त्रीय आणि अर्थशास्त्रीय आधार असावा लागतो.

हे लक्षात घेऊन अकोला येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेतील तज्ज्ञांनी ‘रवंथ करणाऱ्या जनावरांच्या आजारावर उपचारासाठी पंचगव्याचा वापर’ याबाबत संशोधन प्रकल्प हाती घेतला आहे.

‘‘रवंथ करणाऱ्या जनावरांच्या आजारांवरील उपचारासाठी पंचगव्याचा वापर करण्यासाठी देशपातळीवर प्रथमच अशा प्रकारचे संशोधन होत आहे. या प्रकल्पास ‘आत्मा’ अंतर्गत दोन लाख ७० हजार रुपयांचा निधी मिळाला आहे,’’ अशी माहिती सहयोगी अधिष्ठाता डॉ. धनंजय दिघे यांनी दिली.

Desi Cow
Animal Care In Summer : उन्हाळ्यात पशु-पक्ष्यांची कशी घ्यावी काळजी?

पंचगव्याबाबत संशोधन प्रकल्प ः

देशी गोवंशापासून मिळणारे दूध, शेण, मूत्र तसेच दही, तूप या पाच घटकांच्यापासून पंचगव्य तयार केले जाते. रवंथ करणाऱ्या जनावरांच्या आजारावर उपचारासाठी पंचगव्याचा वापर कसा करता येईल, यासाठी संशोधन सुरू झाले आहे. यामध्ये डॉ. प्रशांत कपले हे मुख्य प्रकल्प संशोधक म्हणून काम करीत आहेत.

या प्रकल्पाबाबत ते म्हणाले, ‘‘आर्युर्वेदात मानवाच्या आजारांवरील विविध औषध निर्माणात पंचगव्याचा वापर पूर्वीपासून केला जातो. अनेक संशोधकांनी याबाबत पेटंट मिळवले आहे. पंचगव्य वापराबाबत देशात अनेक ठिकाणी संशोधन सुरू आहे.

याचबरोबरीने स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेत रवंथ करणाऱ्या जनावरांच्या आजारांतील उपचारामध्ये पंचगव्य औषधांचा वापर करण्याबाबत आम्ही संशोधन सुरू केले आहे.’’

Desi Cow
Animal Care : असाधारण रंगसूत्रांमुळे जनावरांमध्ये काय परिणाम दिसतात?

याचबरोबरीने आम्ही पंचगव्य औषधी आणि गो आधारित पदार्थ निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळा सुरू केल्या आहेत. आतापर्यंत ५२० गोपालकांनी प्रशिक्षण घेतले आहे.

प्रशिक्षणाला प्रात्यक्षिकाची जोड देण्यासाठी म्हैसपूर (जि.अकोला) येथील आदर्श गोसेवा व अनुसंधान प्रकल्प आणि गो अनुसंधान केंद्र, देवळापार (जि.नागपूर) यांच्याशी सामंजस्य करार झाला आहे.

राधाकृष्ण तोष्णिवाल आयुर्वेद महाविद्यालयातील वैद्य या प्रकल्पामध्ये संशोधनासाठी सहाय्य करीत आहेत.

देशी गोवंशाच्या शेण, मूत्र आणि दुधातील घटकांचे सरासरी प्रमाण ः

१) दुधातील घटक ः पाणी ८७ टक्के, प्रथिने ३.३ टक्के, चरबी ३.५ ते ४.५ टक्के, लॅक्टोज ४.५ टक्के, सोडियम ४३ मिग्रॅ, कॅल्शियम ११८ मिग्रॅ, लोह ०.०३ मिग्रॅ, जीवनसत्त्व ड आणि क.

२) गोमुत्रातील घटकः पाणी ९५ टक्के, नत्र २.५ टक्के, क्षार, मूलद्रव्ये व संप्रेरके २.५ टक्के

३) शेणातील घटकः पाणी ८३ टक्के, नत्र १.१९ टक्के, फॉस्फरस ०.३, पोटॅशियम०.४८, सोडियम ०.१९, कॅल्शिअम २.६० टक्के, मॅग्नेशियम ०.५६ टक्के, कार्बन ३५.५० टक्के, राख ५.४० टक्के.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com