दुधाळ जनावरांतील दगडी म्हणजे काय?

दगडी हा कासेचा आजार असून, या आजारात दुधाळ जनावरांची कास दगडासारखी टणक होते, म्हणून तिला आपण दगडी असे म्हणतो.
Types of Mastitis
Types of MastitisAgrowon

पावसाळा (Rainy Season) सुरु झाला कि वातावरणातील जीवजंतूचे प्रमाण देखील वाढायला लागते. सूक्ष्मजंतूच्या वाढीस अनुकूल वातावरण मिळाल्याने जनावरांना अनेक रोगांची लागण होत असते. यापैकीच एक म्हणजे दगडी होय. दगडी हा कासेचा आजार (Mastitis) असून, या आजारात दुधाळ जनावरांची कास दगडासारखी टणक होते, म्हणून तिला आपण दगडी असे म्हणतो.

जनावरांमध्ये दिसून येणारा कासदाह हा दोन प्रकारचा असतो. एक सुप्त प्रकारचा दुसरा क्लिनिकल कासदाह (Clinical Mastitis). सुप्तावस्थेतील कासदाहमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसत नाहीत. या प्रकारामध्ये जनावरांचे दूध उत्पादन हळू हळू कमी होत जाते. या प्रकारातला कासदाह पशुपालकांच्या पटकन लक्षात येत नाही.

Types of Mastitis
कासदाह आजारावरील प्रतिबंधात्मक उपाय

क्लिनिकल कासदाहमध्ये जनावरांच्या कासेचा आकार आणि दुधाचा रंग या दोन्हीमध्ये बदल होतो. क्लिनिकल कासदाहचे तीव्रतेनुसार तीन प्रकार येतात. जसे कि, मोडरेट, सीव्हिअर आणि तिसरा तीव्र प्रकारचा कासदाह.

Types of Mastitis
जनावरांमध्ये का होतो कासदाह?

माँडरेट (moderate) कासदाहमध्ये कासेतून बाहेर येणाऱ्या दुधाची प्रत खालावलेली दिसून येते. कासेतील दूध तयार करणाऱ्या पेशी फुटल्याने दुधामध्ये गाठी येतात. दुधाचा रंग बदलून तो लालसर (red) रंगाचा होतो.

सिव्हीअरमध्ये कासेला सूज येते. कासेचे तापमान वाढते. कासेला सूज आल्याने, आकार वेडावाकडा होतो. बाधित सडाचा आकार मोठा होतो. पूर्ण कासेला सूज आलेली असल्यास संपूर्ण कास मोठी होते.

शेवटच्या प्रकारात जनावर पूर्णपणे आजारी पडते. तीव्र स्वरूपाच्या वेदना होतात. त्यांना उठताना, बसताना तसेच चालताना त्रास होतो.

कासदाह या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पशुपालन व्यवसायामध्ये जनावरांची आणि गोठ्याची दैनंदिन स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. धार काढण्यापूर्वी आणि धार काढल्यानंतर कास स्वच्छ, धुऊन कोरडी करणे आवश्यक आहे. कास धुण्यासाठी पोटॉशियम परमॅगनेटचा वापर करावा. १५ दिवसांच्या अंतराने किंवा दर महिन्याला जनावरांची कलिफोर्निया मस्टास्टीस चाचणी करावी. सध्या बाजारात टीट डीप मिळते, धार काढल्यानंतर त्याचा वापर केल्यास, चांगला फायदा दिसून येतो.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com