भाकड काळात गायीच्या शरीरात होतात हे बदल!

दूध उत्पादनातील सातत्य टिकवून ठेवण्याच्या दृष्टीकोनातून जनावरांना काही काळ भाकड ठेवणे गरजेचं असते.
dry cow
dry cowAgrowon

दूध उत्पादनातील (milk production) सातत्य टिकवून ठेवण्याच्या दृष्टीकोनातून जनावरांना काही काळ भाकड ठेवणे गरजेचं असते. भाकड काळातील व्यवस्थापनाचा परिणाम दूध उत्पादनावर झालेला दिसून येतो. या काळात कासेतील दूध तयार करणाऱ्या पेशींना आराम मिळून, त्यांचे पुनरुज्जीवन होत असते.

सर्वसाधारणपणे एक गाय ३०० दिवस दुधाचे उत्पादन देते. वर्षाला एक वासरू या संकल्पनेनुसार गाय ३१० दिवस दुधाचे उत्पादन देते. शेवटचे दोन महिने हे भाकड काळाचे असतात आणि याच काळात गाय विण्यासाठीची तयारी करत असते. व्यायल्यानंतरच्या दूध उत्पादनासाठी कासेतील पेशींची पुनर्रचना होत असते. बरेचदा पशुपालक भाकड काळात गायीकडून उत्पादन मिळत नाही म्हणून दुर्लक्ष करताना दिसतात.

dry cow
स्वच्छ दूध उत्पादनाची सूत्रे | Clean Milk Production | ॲग्रोवन

जनावरांचा भाकड काळ हा सर्वसाधारपणे ६० दिवसांचा असतो. सुरुवातीचे ३० दिवस साधारण पोषणाचे असतात. तर शेवटचे ३० दिवस हे प्रसूतीपूर्व आहार व्यवस्थापनाचे असतात. गाभण गाय वेळेत भाकड न केल्यास ती अधिक काळ दूध देत राहते. परिणामी गाय व्यायल्यानंतर लवकर माजाची लक्षणे दाखवत नाही.

dry cow
धार काढताना या गोष्टींचे पालन करा! | Care while milking animals | ॲग्रोवन

गाय भाकड करताना सातव्या महिन्यापासून सर्वप्रथम धार काढणे कमी करत, नंतर एक दिवसाआड धार काढावी. धार काढायची पूर्णपणे बंद करताना सडातून प्रतिजैविकाच्या ट्यूब सोडून त्यानंतर जनावराचे दूध काढू नये.

सहाव्या ते सातव्या महिन्यात गर्भाशयातील वासराची वाढ जोमाने होत असते. या काळात गर्भातील वासराला पोषक घटक आवश्यक त्या प्रमाणात न मिळाल्यास, वासराची वाढ खुंटते. शरीरातील सर्व आवश्यक घटक दुधाद्वारे बाहेर पडत असल्याने, विताना किंवा व्यायल्यानंतर जनावरांच्या शरीरात आवश्यक घटकांची कमतरता भासू लागते.

भाकड जनावरांना कळपापासून वेगळे ठेवावे. त्यांना दररोज खरारा करावा. दिवसातून दोन ते तीन वेळेस मुबलक ताजे, स्वच्छ पाणी पाजावे. भाकड गायी-म्हशीला सर्वसाधारणपणे बारा ते पंधरा किलो हिरवा चारा, आठ ते नऊ किलो सुका चारा आणि एक ते दोन किलो खुराक द्यावा.

विण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी राहिला असताना, अशा गायींचे स्वतंत्र व्यवस्थापन करावे. जनावरांच्या भाकड काळात गायी किंवा म्हशींना कोणत्याही आजारात,पशुवैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणत्याही आजारात घरगुती उपाय करु नये.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com