Buffalo market: खरेदीदार नसल्याने म्हशींचा बाजार पडलेलाच

आजच्या बाजारात एकूण ६०-७० म्हशी असतील. म्हणजे आवक खूपच कमी. तरीही बाजार पडलेलाच. याचं कारण खरेदीदार शेतकरी नाहीच. छोटे-मोठे तीस-चाळीस व्यापारी, दलाल. त्यांना बरोबर अंदाज असतो. अपवाद सोडले तर त्यांचं एकमेकात साटेलोटं असतं.
Buffalo Market
Buffalo MarketAgrowon

आजही एक म्हैस घेऊन बाजारला (Buffalo Market) गेलो होतो. टेम्पोचालक, मालक संगम कलमे आणि मी. संगम शेतीही करतो. गेल्या अनेक वर्षांपासून म्हैस विक्री -खरेदी (Buffalo Sale - Purchase) करायची असली की, त्यालाच बोलावतो. मी त्याला विचारतो, किती पैसे देऊ? तो सांगेल ते देतो. अर्थात तो योग्यच सांगतो. प्रश्न केवळ भाड्याचा नाही. त्याच्या स्वभावाचा आहे. इतर कोणी टेम्पोचालक असेल तर, तो म्हैस बाजारात सोडून, भाडे घेऊन निघून जाईल.

Buffalo Market
देशी गायी, म्हशी संशोधन प्रयोगशाळा उभारणार

संगम बाजारात येतो. म्हशीसाठी मेक ठोकणं, बांधणं याला मदत करतो. बऱ्याचदा व्यवहार होईपर्यंत थांबतो. त्याला थांबवून मला बाजारात फेरफटका मारता येतो. त्याच्याशी गप्पा मारत वेळ कटतो. बाजारात चार-पाच तास एकाच ठिकाणी उभं राहावं लागतं. त्यावेळी आपला माणूस सोबत असला की वेळ चांगला जातो.

Buffalo Market
‘गोकुळ’चे नेते, संचालक घेणार स्वतः म्हशी

आजच्या बाजारात एकूण ६०-७० म्हशी असतील. म्हणजे आवक खूपच कमी. तरीही बाजार पडलेलाच. याचं कारण खरेदीदार शेतकरी नाहीच. छोटे-मोठे तीस-चाळीस व्यापारी, दलाल. त्यांना बरोबर अंदाज असतो. अपवाद सोडले तर त्यांचं एकमेकात साटेलोटं असतं. एका म्हशीची एखाद्या व्यापाऱ्याने किंमत केली की, दुसरे तिची किमत वाढवत नाहीत. विकण्याशिवाय पर्याय नाही, असे शेतकरी विकून मोकळे होतात. बाजारात शेतकरी खरेदीदार असतात तेव्हाच स्पर्धा असते.

आमच्या म्हशीला अपेक्षित किंमत येत नव्हती. तरीही मी विकायचं ठरवलं. चार-पाच दिवसात ती बाळ देणार हे स्पष्ट आहे. म्हैस व्याली की, ती विकणं अधिक अवघड होतं. शिवाय सध्या दूध देणाऱ्या दोन म्हशी असताना तिसरी नकोच होती. त्यामुळे कमी किंमत आली तरी विकून टाकली. सगळ्या शेतीपूरक व्यवसायात एवढी अनिश्चितता आहे की, कशातही हमखास फायदा मिळेल असं सांगता येत नाही. त्यामुळेच पशुपालन करू का, असा प्रश्न विचारणाऱ्यांना मी सांगतो की, ते तुम्हीच विचारपूर्वक ठरवा. मी हो किंवा नाही म्हणणार नाही.

बाजारात आलेलं गिऱ्हाईक म्हशीला सोडायला लावतं. तिला एक चक्कर मारून आणावी लागते. म्हशीच्या पायात काही दोष आहे का? हे बघण्यासाठी हे करावे लागते. आज पाच-सहा वेळेस म्हशीला फिरवण्याचं काम मलाच करावं लागलं. हे सगळं बघणारा संगम म्हणाला, ही म्हैस तर तुम्ही फुकट सांभाळल्यासारखं झालं. मी बघतोय, म्हशीचा धंदा परवडत नाही तरी तुम्ही एवढी दगदग कशाला करता?

मी म्हटलं, तू म्हणतोस ते खरं आहे. पण म्हशीपालनाचा नाद आहे मला. आता सवय झालीय. गायी-म्हशीमुळं शेत भरून वाटतं. पैसे उरले नाहीत तरी शेण-मूत मिळतंच की. संगम बोलला, हे खरंय. मी अनेकांचे आखाडे बघितले पण तुमच्यासारखा आखाडा कुठचं नाही. आलं की बसावं वाटतंय. मी म्हटलं, म्हणून तर हा नाद करतोय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com