पशुवैद्यकीय दवाखाने,पशुपालक वाऱ्यावर
CowsAgrowon

पशुवैद्यकीय दवाखाने,पशुपालक वाऱ्यावर

पशू वैद्यकीय अधिकारी व औषधे उपलब्ध नसल्याने विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे पशुपालकांना खासगी डॉक्टरांची मदत घ्यावी लागत आहे.

करजगाव (जि. अमरावती) : ग्रामीण भागातील पशुपालकांना त्यांच्या पशूंवर वेळेच उपचाराची सोय व्हावी, यासाठी शासनाने पशुवैद्यकीय दवाखाने सुरू केले. मात्र करजगाव, चांदूरबाजार, शिरजगाव कसबा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. तर औषधांचा सुद्धा अभाव आहे. त्यामुळे हे दवाखाने केवळ नाममात्र ठरत आहेत.

येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारती फक्त आता शोभेच्या वास्तू म्हणून दिसत आहे. एवढे मोठे दवाखाने असून सुद्धा पशुपालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पशू वैद्यकीय अधिकारी व औषधे उपलब्ध नसल्याने विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे पशुपालकांना खासगी डॉक्टरांची मदत घ्यावी लागत आहे. परिणामी, गोरगरीब पशू मालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

करजगाव येथे गेल्या दीड वर्षांपासून पशुवैद्यकीय पद रिक्त आहे. सध्याचा अतिरिक्त प्रभार हा कांडली येथील पशुवैद्यकीय अधिकारी सांभाळत आहेत. आठवड्यातील फक्त एक किंवा दोन दिवस या ठिकाणी येतात. करजगाव अंतर्गत बोदड, कारंजा बहिरम, सर्फापूर, कलोडी, अलमपूर या गावांतील पशू पालकसुद्धा करजगाव येथील वैद्यकीय दवाखान्यात येतात. परंतु पशुवैद्यकीय अधिकारीच नसल्याने या ठिकाणी सर्वांची पायपीट होत आहे. शिरजगाव कसबाची सुद्धा हीच परिस्थिती असून चांदूरबाजारची स्थिती यापेक्षा वेगळी नाही.

आम्ही वेळोवेळी वरिष्ठांकडे पाठपुरावा केला आहे. सध्या माझ्याकडे तालुक्याचा प्रभार आहे. चांदूर बाजारातील पशुवैद्यकीय दवाखान्यात मी कार्यरत आहे. शिरजगाव कसबा करजगाव व चांदूर बाजार येथील पदेही लवकर भरावी, याकरिता आम्ही अनेकदा वरिष्ठांकडे मागणी केली आहे.

डॉ. पी. एन. ठाकूर, प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com