Lumpy Skin : लम्पी स्कीन आजाराचे पशुपालकांना आर्थिक धक्के

सर्वसामान्य पशुपालकांना ‘लम्पी स्कीन’चे आर्थिक धक्के बसण्यास प्रारंभ झाला आहे. ‘लम्पी’ झालेल्या जनावरांसाठी वारेमाप खर्च होत असल्याने दूध संस्थांकडे आता उत्पादकांकडून ॲडव्हान्सची मागणी करण्यात येत आहे.
Lumpy Skin
Lumpy Skin Agrowon

कोल्हापूर : सर्वसामान्य पशुपालकांना ‘लम्पी स्कीन’चे (Lumpy Skin) आर्थिक धक्के बसण्यास प्रारंभ झाला आहे. ‘लम्पी’ झालेल्या जनावरांसाठी (Lumpy Skin Infection) वारेमाप खर्च होत असल्याने दूध संस्थांकडे आता उत्पादकांकडून ॲडव्हान्सची मागणी करण्यात येत आहे.

गावोगावी जाळे असणाऱ्या दूध संस्थांनी परिस्थिती ओळखून उत्पादकांना ‘ॲडव्हान्स’च्या रूपात निधी दिला आहे. जर खर्च वाढला तर आगामी काही दिवस दूध उत्पादकांच्या हातात केवळ संस्थेला दूध घालणे इतकेच काम उरणार आहे.

Lumpy Skin
Lumpy Skin : अकोला जिल्ह्यातील तीन हजार पशुधनांना प्रादुर्भाव

शेती बरोबरच दुग्ध व्यवसाय हा सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. शेतकऱ्यांच्या संसाराचा गाडा ओढण्यासाठी दहा दिवसाला निघणारे बिल हे शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचे ठरत असते. जरी शेतीचे नुकसान झाले तरी या व्यवसायाच्या जीवावर शेतकरी आपली गुजराण करतात. पशुखाद्य व अन्य खर्च वजा जाता मिळणाऱ्या रकमेवर पशुपालक शेतकरी आपला संसार हाकत असतो.

Lumpy Skin
Lumpy Vaccine : ‘लम्पी स्कीन’वरील लसीकरणासाठी ३१० खासगी सेवादात्यांची सेवा

गेल्या पंधरा दिवसांपासून मात्र शेतकऱ्यांच्या गोठ्यातील संपदेला दृष्ट लागली. प्रत्येक गाईच्या गोठ्यामध्ये जनावरे ‘लम्पी’ग्रस्त होत आहेत. जिथे लसीकरण झाले नाही तिथे जर लम्पीचा प्रादुर्भाव झाला तर जनावरांना लसही देता येत नाही. लम्पी झाल्या झाल्या औषधांचा मारा करावा लागतो.

बऱ्याचदा मनुष्यबळ कमी असल्याने पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी लगेच उपलब्ध होत नाहीत किंवा ते येईपर्यंत तातडीचा उपचार गरजेचा असतो या वेळी मात्र स्थानिक खासगी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घ्यावी लागते. सलाइन, रक्त तपासणी व महागडी औषधे यामुळे एकेका जनावराचा खर्च काही हजारांच्या पटीत आहे.

जनावरे जगवण्यासाठी उपचार हा महत्त्वाचा असल्याने उत्पादक अशा औषधांसाठी प्राधान्य देत आहेत. अनेकदा खासगी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून महागडी औषधे लिहून देण्यात येत असल्याने त्याचा वापरही बऱ्याच ठिकाणी होत आहे. यामुळे उत्पादकाला आर्थिक गरज भासू लागली आहे. याचा परिणाम साहजिकच दुग्ध संस्थांकडे पैशाची मागणी वाढण्यावर होत आहे.

ज्या भागात रोगाचे प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी तर बहुतांशी संस्थाकडे उत्पादक अॅडव्हान्सची मागणी करत असल्याचे दूध संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले. अनेक जणांच्या हाती पैसा नसल्याने उत्पादक दूध संस्थेकडून ॲडव्हान्स घेऊन औषधाचा खर्च करत असल्याचे दूध संस्थांच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले.

दूध उत्पादकांना आम्ही संस्थेच्या वतीने आर्थिक मदत करत आहोत. उत्पादकांसाठी लागेल तेवढी रक्कम आम्ही देत आहोत. उपचारासाठी आगाऊ रक्कम मागणीचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून लक्षणीय वाढले आहे.
विनायक पाटील, अध्यक्ष, शिवनेरी दूध संस्था अतिग्रे, जि. कोल्हापूर
बाधित जनावरांवर औषधोपचार करण्यासाठी लागणारा आवश्यक औषधसाठा पशू वैद्यकीय विभागाकडे उपलब्ध आहे. जर कोणी शासकीय पशुवैद्यकाने बाहेरुन औषधे खरेदी करण्यासाठी चिठ्ठी लिहून दिली, सक्ती केली तर जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे तक्रार नोंदवावी.
राहुल रेखावार, जिल्हाधिकारी, कोल्हापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com