Lumpy Skin Disease : सातारा जिल्ह्यात अकरा जनावरांना ‘लम्पी स्कीन’

सातारा : जिल्ह्यात लम्पी स्कीन या आजाराची ११ जनावरे आढळून आली आहेत. वाघेरी (ता. कऱ्हाड) येथील सहा व फलटण तालुक्यातील पाच जनावरांना या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे.
Lumpy Skin Disease
Lumpy Skin DiseaseAgrowon

सातारा : जिल्ह्यात लम्पी स्कीन या आजाराची (Lumpy Skin Disease Satara) ११ जनावरे आढळून आली आहेत. वाघेरी (ता. कऱ्हाड) येथील सहा व फलटण तालुक्यातील पाच जनावरांना या आजाराचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Outbreak In Satara) झाला आहे. तसा पुणे येथील पशुरोग अन्वेषणचा अहवाल (Animal Disease Investigation Report) आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin Disease : ‘लम्पी स्कीन’मुळे राज्यात २२ जनावरांचा मृत्यू

वाघेरी (ता. कऱ्हाड) येथील सहा जनावरांमध्ये या आजाराची लक्षणे आढळल्यानंतर पाच किलोमीटर परिसरातील ८८६ जनावरांचे लसीकरण केले आहे. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी सर्व तालुक्यांत उपाययोजना केल्या होत्या.

वाघेरी येथील सहा जनावरांमध्ये लम्पी स्कीन आजाराची लक्षणे आढळून आल्याने बाधित जनावरे विलगीकरणात ठेवली आहेत. या जनावरांचे रक्ताचे नमुने व गाठीचा छोटा भाग तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविला. या बाबत प्रयोगशाळेचा अहवाल आला आहे. फलटण तालुक्यातही या आजाराचा शिरकाव झाला आहे. पशुसंवर्धन विभागाने दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com