Mission लाळ्या खुरकुत निर्मुलनाचे !

लाळ्या खुरकुतचे निर्मुलन करायचे असल्यास लसीकरण महत्वाचे आहे. वर्षातून दोन वेळा लाळ्या खुरकूत विरुद्ध जनावरांचे लसीकरण केले पाहिजे.
Mission लाळ्या खुरकुत निर्मुलनाचे !
Eradication Of FMDAgrowon

लाळ्या खुरकुतचे निर्मुलन (FMD eradication) करायचे असल्यास लसीकरण (vaccination) महत्वाचे आहे. वर्षातून दोन वेळा लाळ्या खुरकूत विरुद्ध जनावरांचे लसीकरण केले पाहिजे. लसीकरण केल्यानंतर लसीमुळे प्रतिकारशक्ती तयार होण्यासाठी किमान १५ दिवस लागतात. पुढे जाऊन सहा महिन्यापर्यंत ही प्रतिकारशक्ती टिकून राहते.

लाळ्या खुरकूत (Foot and Mouth Disease) रोगामध्ये सुरुवातीला ताप येतो. हा ताप काहीवेळेस १-३ दिवस राहू शकतो. अनेक संसर्गजन्य रोगांमध्ये ताप येणे, हे प्राथमिक लक्षण असते. दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी बाधित जनावरांच्या तोंडामध्ये तसेच पायातील मधल्या बेचक्यात फोड येतात. हे फोड फुटून लाल जखम तयार होते. त्वचेचा पडदा फाटतो. अशा जनावराला चारा खाता येत नाही किंवा चारा खात असताना चघळताना खूप त्रास होतो.

Eradication Of FMD
लाळ्या खुरकूत रोगावर प्रतिबंधात्मक उपाय कोणते?

बाधित जनावरांची योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. रोगाची बाधा झाल्यानंतर विशिष्ट लक्षणे ओळखून पशुवैद्कामार्फत उपचार करावा. तोंड सोड्याच्या पाण्याने धुऊन घ्यावे. दिवसातून ३ वेळा बोरोग्लिसीरीन टाकावे. पायाची स्वच्छता करून जंतुनाशकांची फवारणी करावी. अशा जनावरांना कोवळा लुसलुशीत चारा खाण्यास द्यावा. पिठाची कांजी शिजवून द्यावी.

Eradication Of FMD
जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण गरजेचं !

आर्थिकदृष्ट्या सर्वात खर्चिक आजार अशी ओळख असलेला रोग म्हणजे लाळ्या खुरकुत होय. एखाद्या गावामध्ये किंवा गोठ्यामध्ये या रोगाची साथ आली तर १०० टक्के जनावराला या रोगाची बाधा होऊ शकते. म्हणून लाळ्या खुरकुत रोग २०२५ पर्यंत नियंत्रणात आणणे आणि २०३० पर्यंत देश लाळ्या-खुरकूत रोगमुक्त करण्याचे धोरण ठेवले आहे. हे उद्दिष्ट व्यापक सामुदायिक लसीकरण मोहिमेतूनच साध्य होणार आहे.

लाळ्या-खुरकूत रोगप्रतिकारक लस आपल्या राज्यात तयार होत नाही. ही लस एकाच ठिकाणहून तेही बाहेरील राज्यातील कंपनीकडून उपलब्ध होत असल्याने त्याचा गरजेनुसार पुरवठा होत नाही. अशावेळी महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्थेत लाळ्या-खुरकूत रोग प्रतिकारक लसींची निर्मिती झाली पाहिजे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com