Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’ नियंत्रणासाठी छावण्यांचा प्रयोग राबवा

तुटपुंज्या मनुष्यबळाच्या भरवशावर ‘लम्पी स्कीन’चे नियंत्रण जिकरीचे झाले आहे. जिल्हा परिषद गटनिहाय चारा छावणीच्या धर्तीवर लम्पी स्कीनच्या नियंत्रणासाठी देखील छावण्यांचा प्रयोग राबवावा, अशी मागणी होत आहे.
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon

नागपूर : तुटपुंज्या मनुष्यबळाच्या भरवशावर ‘लम्पी स्कीन’चे नियंत्रण (Lumpy Skin Control) जिकरीचे झाले आहे. जिल्हा परिषद गटनिहाय चारा छावणीच्या धर्तीवर लम्पी स्कीनच्या नियंत्रणासाठी (Animal Camp For Lumpy Skin) देखील छावण्यांचा प्रयोग राबवावा, अशी मागणी होत आहे. जिल्हा परिषद गटातील सर्व जनावरे या ठिकाणी एकत्रित करून त्यांच्यावर उपचार झाल्यास या रोगावर प्रभावी नियंत्रण मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Lumpy Skin
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’मुळे मृत पशुधनासाठी मिळणार मदत

देशातील अनेक राज्यांसोबतच महाराष्ट्रात देखील जनावरांमध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी या आजाराचा जनावरांमध्ये प्रादुर्भाव झाला होता. यावर्षी पुन्हा हा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. या आजाराच्या नियंत्रणासाठी पशुसंवर्धन खाते जागरूकपणे कार्य करीत आहे. मात्र त्यानंतर देखील यावर अद्याप पूर्णपणे नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामागे या खात्यातील रिक्त पदांचा अनुशेष हे कारण सांगितले जाते. पशुसंवर्धन खात्यात मोठ्या संख्येने रिक्त पदे आहेत. परिणामी उपलब्ध मनुष्यबळावर कामाचा ताण वाढला आहे.

Lumpy Skin
Lumpy Skin : गोठ्यांना मरणकळा ‘लम्पी स्कीन’पुढे पशुपालक हतबल

एका पशू चिकित्सालयाअंतर्गत अनेक गावांत सध्या या आजाराच्या नियंत्रणासाठी पशुवैद्यकांची चांगलीच दमछाक होत आहे. लसीकरण वेळेत करण्याच्या सूचना असल्याने काही पशुवैद्यक रात्री बारा वाजेपर्यंत राबून हे काम पूर्ण करीत असल्याचे चित्र राज्यात अनेक भागांत पहावयास मिळत आहे. त्यामुळे शासनाने चारा छावण्यांच्या धर्तीवर जिल्हा परिषद गटनिहाय छावण्यांचा प्रयोग राबवावा, अशी मागणी पशुवैद्यकांमधून होत आहे. एका जिल्हा परिषद गटातील सर्व जनावरे एका ठिकाणी एकत्रित केल्यास त्या ठिकाणी आरोग्य सेवा देणे पशुवैद्यकांना देखील सोयीचे होईल. त्याद्वारे जनावरांमधील मृत्यू देखील नियंत्रणात येतील, अशीही अपेक्षा आहे.

शासनाने खासगी स्त्रोतांमार्फत तात्पुरत्या स्वरूपात पदभरतीला मान्यता दिली आहे. परंतु ही प्रक्रिया अद्यापही कागदावरच आहे. लम्पी स्कीनचे पूर्णपणे नियंत्रण झाल्यावरच ही पदे भरती जातील, अशी शक्यता आहे. त्यामुळे त्यानंतर या कर्मचाऱ्यांचा उपयोग काय? असा प्रश्न आहे.

रिक्त पदांची संख्या मोठी असल्याने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रयत्न अपुरे ठरत आहेत. त्यांच्यावर कामाचा वाढता ताण आहे. शासनाने चारा छावण्यांच्या धर्तीवर लम्पी स्कीन नियंत्रणासाठी देखील छावण्यांचा प्रयोग राबविला पाहिजे. जिल्हा परिषद गटातील सर्व जनावरे एकत्रित करून त्यांच्यावर उपचार केल्यास त्यातून चांगले परिणाम साधता येतील.
डॉ. रामदास गाडे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यकीय संघटना, पुणे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com