IVF Technology : ‘आयव्हीएफ’ तंत्राचा ‘गोकुळ’मध्ये प्रयोग

तीन वर्षांसाठी निवडक पाचशे गाई, म्हशीत करणार गर्भ प्रत्यारोपण
IVF Technology
IVF TechnologyAgrowon

कोल्हापूर : आयव्हीएफ (टेस्ट ट्यूब बेबी) (IVF) तंत्रज्ञानाद्वारे गाईंमध्ये गर्भ प्रत्यारोपण करण्याचा प्रयोग कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) (GOKUL Group) दूध संघात करण्यात येत आहे. एनडीडीबी (राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ) (NDDB) मार्फत गोकुळ संलग्न दूध संस्थेमध्ये पुढील तीन वर्षांसाठी निवडक पाचशे जनावरांमध्ये गर्भ प्रत्यारोपण करण्यात येणार आहे.

IVF Technology
Gokul Milk : गोकुळ’ देणार दूधदर फरकाचे १०२ कोटी ८३ लाख रुपये

पहिल्या टप्प्यात गाई आणि दुसऱ्या टप्प्यात म्हशींवर आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे गर्भ प्रत्यारोपण होणार आहे. शिवाय गाई-म्हशींच्या गर्भधारणांची खात्री आता फक्त २८ दिवसांत होणार आहे. किटद्वारे हे तपासणी होणार आहे.

IVF Technology
Gokul Annual Meeting : ‘गोकुळ’च्या सभेत प्रचंड घोषणाबाजी, गोंधळ

२०२२-२३ या वर्षांमध्ये गाईंचे चाळीस गर्भ व म्हशीचे ११० असे एकूण १५० गर्भ मंजूर झाले आहेत. या प्रकल्पामुळे दूध उत्पादकांच्या गोठ्यामध्ये कमी कालावधीत म्हणजेच एका पिढीमध्ये उच्च जातिवंत व फक्त मादी वासरांचे पैदास होणार आहे.

IVF Technology
Sugar Market : आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय पांढऱ्या साखरेला पसंती

या तंत्रज्ञानाद्वारे जन्मणारी वासरे उच्च वंशावळीची असून त्यांचे दूध उत्पादन गाईंमध्ये प्रतिवेत ६ हजार लिटरपेक्षा अधिक, तर म्हशीमध्ये प्रतिवेत ४ हजार लिटरपेक्षा अधिक राहणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या दूध उत्पादकांना संघाच्या वतीने खर्चाच्या ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

IVF Technology
Sugar Export : साखर निर्यातीवर बंधने लादण्याचे धोरण बंद करा

या कार्यक्रमांतर्गत गर्भ प्रत्यारोपण करण्यासाठी २१ हजार रुपयांचा खर्च आहे. जनावर गाभण राहण्याची खात्री झाल्यानंतर प्रत्येक जनावरासाठी केंद्र सरकारकडून ५ हजार, तर गोकुळ दूध संघाकडून ७ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

IVF Technology
Sugar Mill : माळेगाव कारखान्याने दिला ३,१०० रुपये अंतिम ऊसदर

उर्वरित रक्कम लाभार्थी दूध उत्पादकांच्या दूध बिलातून कपात करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण ५०० गर्भ प्रत्यारोपणासाठी गोकुळ दूध संघामार्फत २५ लाख रुपयांचे अनुदान दूध उत्पादकांना देण्यात येणार आहे. एनडीडीबीचे अधिकारी एस. पी. सिंह, ‘गोकुळ’चे अधिकारी डॉ. उदयकुमार मोगले, डॉ. प्रकाश दळवी यांनी गर्भ प्रत्यारोपण कार्यक्रमाची माहिती दिली.

आठ दिवसांत होणार गर्भधारणेची खात्री

गोकुळच्या अधिकाऱ्यांनी गाई-म्हशींच्या गर्भधारणांची खात्री आता फक्त आठ दिवसांत होऊ शकते, असे सांगितले. यापूर्वी गर्भधारणेची खात्री करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागत असे.

परंतु आयडेक्स लॅबोरेटरी अमेरिका या कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्मिती केलेल्या गर्भ तपासणी केंद्राद्वारे २८ दिवसांत गर्भधारणेबाबत खात्री करणे सोपे झाले आहे. गोकुळ दूध संघामार्फत दूध उत्पादकांना २५ टक्के अनुदानावर गाई-म्हशींच्या गर्भधारणेची खात्री करून घेता येणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com