गोचीड पसरवतात हे रोग !

जनावरांच्या अंगावरून गोचीड घालविण्यासाठी त्यांना नेहमी खरारा करावा. गोठ्यात चुना मारावा. आठवड्यातून एक वेळ जनावरांना कीटकनाशक औषध वापरून धुतल्या तरूण, प्रौढ गोचीडाचे निर्मुलन करता येते.
Ticks Control Methods
Ticks Control MethodsAgrowon

गोचीड (Ticks) हा रक्तावर उपजीविका करणारा परजीवी असून त्याचे जीवनचक्र साधारणपणे तीन वर्षाचे असते. जन्मानंतर सहा आठवड्यातच गोचीड तरूण अवस्थेत जातो. ही अवस्था जास्त काळ टिकते. या अवस्थेत गोचीडला आठ पाय असतात.

जनावरांच्या अंगावरून गोचीड घालविण्यासाठी त्यांना नेहमी खरारा करावा. गोठ्यात चुना (lime) मारावा. आठवड्यातून एक वेळ जनावरांना कीटकनाशक औषध वापरून धुतल्या तरूण, प्रौढ गोचीडाचे निर्मुलन करता येते.

Ticks Control Methods
जनावरांतील गोचीड नियंत्रणासाठी काय उपाय करावेत?

गोचीडाचे जीवनचक्र पूर्ण होण्यासाठी त्यांना साधारणपणे एक ते तीन प्राण्यांची गरज असते. गोचीड चावल्याने जनावरांची त्वचा बधीर होत असते. परिणामी गोचीड चावल्याची जाणीव जनावराला होत नाही. रक्त पिताना गोचीड इतरही अनेक जंतूचा प्रसार करत असतात. जनावरांच्या शरीरातून रक्त शोषल्यानंतर ते पचविण्यासाठी गोचीड जमिनीवर येत असतो. त्यामुळे फवारणी करताना ती गोठयातही करणे गरजेचं आहे.

Ticks Control Methods
गोचीड नष्ट करण्याचे जैविक उपाय

एक गोचीड साधारणपणे एक ते दोन मिली रक्त पीत असतो. गोचीडाच्या चाव्यामुळे जनावरांना टिक पॅरालिसीस नावाचा आजार होण्याची शक्यता असते. गोचीडमुळे जनावरांना रक्तपेशींचे रोग देखील होत असतात. यामध्ये थायलेरीयासीस सारख्या आजारांची देखील बाधा होऊ शकते.

नर गोचीड प्रजननानंतर मरतो. याचाच गोठ्यात मेलेले नर गोचीड दिसत असल्यास तर मादी गोचीडानी गोठ्यात अंडी घातली आहेत असे समजावे.

पावसाळ्यात नवीन उगवलेल्या गवताच्या पात्याच्या टोकावर बसून राहतो. त्यामुळे जनावरे चरून आल्यानंतर त्यांची तपासणी करावी.

मुक्त संचार गोठा असल्यास कोंबड्या पाळून प्रौढ गोचीडांचे निर्मूलन करण्यास मदत होते. जनावरांचा गोठा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. दर महिन्याला गोठ्यात चुना मारून घ्यावा.गोठ्यातील भेगा, कपारीमधील गोचिडाची अंडी फ्लेमगनच्या किंवा टेंभ्याच्या साह्याने जाळून घ्यावीत. लाकडी गोठा असल्यास लोखंडी पत्र्याच्या सहाय्याने खरडपट्टी करून गोचीड प्रजनन जागा भेगा, फटी, छिद्रे, बिळे या जागेतील अंडी व गोचीड अवस्था गोठ्याच्या बाहेर जाळून टाकावीत.

जनावरांचा नियमित खरारा करावा. गोचीड निर्मुलनासाठी फवारणी करताना वापरायच्या औषधाची तीव्रता योग्य प्रमाणात घ्यावी. जनावरांच्या अंगावर फवारणी करताना तीव्रता कमी ठेवावी याउलट गोठ्यात फवारणी करताना तीव्रता जास्त ठेवल्यास चालते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com