Buffalo Farming : सौरश सुरसेटवार या शेतकऱ्याचे यशस्वी म्हैसपालन नियोजन

नांदेड जिल्ह्यातील सगरोळी (ता. बिलोली) येथील सौरभ विजयानंद सुरसेटवार या तरुणाने ५ म्हशींपासून सुरु केलेला दुग्धव्यवसाय आज १५ म्हशींपर्यंत पोचला आहे.
Buffalo Farming
Buffalo FarmingAgrowon

शेतकरी ः सौरभ विजयानंद सुरसेटवार

गाव ः सगरोळी ता. बिलोली, जि. नांदेड.

एकूण शेती ः २ एकर (भाडेतत्त्वावर)

म्हशी ः १५

Buffalo farming : नांदेड जिल्ह्यातील सगरोळी (ता. बिलोली) येथील सौरभ विजयानंद सुरसेटवार या तरुणाने ५ म्हशींपासून सुरु केलेला दुग्धव्यवसाय (dairy business) आज १५ म्हशींपर्यंत पोचला आहे. सौरभ यांनी पुण्यामधून एबीए (फायनान्स) मध्ये पदवी घेतली आहे.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळ पुण्यामध्ये बँकेत नोकरी केली. परंतु, गावाची ओढ आणि दुग्ध व्यवसायातील संधी यामुळे त्यांनी नोकरी सोडण्याची निर्णय घेतला. २०१८ मध्ये त्यांनी ५ म्हशींपासून दुग्धव्यवसायास सुरवात केली.

Buffalo Farming
Dairy Business : इमडे यांचा दीडशे गायींचा आदर्शवत दुग्ध व्यवसाय

आज त्यांच्या गोठ्यामध्ये मुऱ्हा जातीच्या १५ म्हशी आहेत. त्या पासून प्रतिदिन साधारण ९० लिटर दूध उत्पादन (milk production) मिळते. त्याची गावामध्येच ६० रुपये प्रतिलिटर दराने विक्री केली जाते. गोठ्यातून उपलब्ध होणाऱ्या शेणखताची देखील विक्री केली जाते.

सौरभ यांच्याकडे स्वतःच्या मालकीची शेतजमीन नाही. त्यामुळे म्हशींना चारा आणि निवाऱ्याची सोय करण्यासाठी गावातील एका शेतकऱ्याची २ एकर जमीन १० वर्षांच्या करारावर भाडेतत्त्वावर घेतली आहे.

त्यावर निवाऱ्यासाठी २६ बाय ५२ फूट आकाराचा गोठा आणि चारा ठेवण्यासाठी २५ बाय २५ फूट आकाराचे शेड उभारले आहे. उर्वरित क्षेत्रामध्ये चाऱ्यासाठी सुपर नेपिअर आणि शेवगा या पिकांची लागवड केली आहे.

खाद्य व्यवस्थापन ः

१) म्हशींना दररोज सकाळी आणि सायंकाळी असे दोन वेळा हिरवा व वाळलेला चारा २० किलो प्रमाणे दिला जातो. हिरव्या चाऱ्यामध्ये नेपिअर गवत, शेवग्याचा पाला आणि वाळलेल्या चाऱ्यामध्ये वैरण दिली जाते. सोबतच चार ते सात किलोपर्यंत पशुआहार आणि ५० ग्रॅम खनिज मिश्रण दिले जाते.

२) प्रत्येक म्हशीला खाद्य देण्यासाठी सिंमेटची स्वतंत्र चौरस आकाराची गव्हाण ठेवल्या आहेत. त्यामुळे चारा वाया जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

३) आठ दिवसांतून एक वेळ मीठ, हळद आणि खाण्याचा सोडा असे एकत्रित करून जनावरांना दिले जाते. त्यामुळे दुधाचे सकस उत्पादन मिळण्यास मदत होत असल्याचे सौरभ सांगतात.

Buffalo Farming
Animal Feed : पशुखाद्य दरवाढीमुळे दूध उत्पादक अडचणीत

दैनंदिन नियोजन ः

* दररोज सकाळी चार वाजता गोठ्यातील कामांना सुरवात होते.

* प्रथम गोठ्यातील शेण काढून साफसफाई केली जाते. गोठ्यामध्ये स्वच्छतेवर विशेष भर दिला जातो.

* त्यानंतर दूध काढले जाते.

- दूध काढल्यानंतर हिरवा आणि वाळलेला चारा दिला जातो.

* सायंकाळी चार ते पाच वाजता दूध काढले जाते.

* त्यानंतर चारा आणि खुराक दिला जातो.

* दोन्ही वेळचे मिळून साधारणपणे ९० लिटर दुधाचे संकलन होते. संपूर्ण दुधाची गावामध्येच विक्री केली जाते.

* म्हशींच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. नियमित लसीकरण आणि जंतनाशकांची मात्रा दिली जाते.

- आजारी जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी बांधली जातात. त्यांचे स्वतंत्र व्यवस्थापन केले जाते.

- म्हशींना गोठ्यामध्येच पिण्यासाठी मुबलक आणि स्वच्छ पाण्याची उपलब्धता केली जाते.

सौरभ सुरसेटवार, ९५९५४४००५१ (शब्दांकन ः कृष्णा जोमेगांवकर)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com