Animal Vaccination : शेतकऱ्यांनी वेळच्या वेळी जनावरांचे लसीकरण करावे

Animal Care : दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनी उत्तम प्रतीच्या गायी सांभाळत असताना या गाईंसाठी मुक्तसंचार गोठा उभारावा. जेणेकरून गाईंचे आरोग्य चांगले राहील.
Vaccination Of Animals
Vaccination Of AnimalsAgrowon

Animal Health News : दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनी उत्तम प्रतीच्या गायी सांभाळत असताना या गाईंसाठी मुक्तसंचार गोठा उभारावा. जेणेकरून गाईंचे आरोग्य चांगले राहील. त्याचप्रमाणे लसीकरण वेळच्यावेळी करून घ्यावे.

त्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात असल्याने याचाही लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी केले.

जागतिक पशुसंवर्धन दिनाचे औचित्य साधून पुणे जिल्हा परिषद पुणे पशुसंवर्धन विभाग पुणे व पंचायत समिती आंबेगाव यांच्या वतीने काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे रविवारी (ता. २१) शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. विधाटे बोलत होते.

Vaccination Of Animals
Animal Care : रंगसूत्रांतील विकृतीमुळे जनावरांवर काय परिणाम होतात?

या वेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रशांत साळवे, सरपंच अशोक करंडे, माजी उपसरपंच विशाल करंडे, डॉ. सुरेश कड, डॉ. विशाल येवले, डॉ. प्रकाश शिंदे, डॉ. राजेश भुरे, डॉ. शीतल कापसे, डॉ. नागेश पुरी, बी. के. पानसरे, डी. बी. कराळे, बजरंग करंडे, हनुमंत थोरात, विजय करंडे, दत्तात्रय करंडे, मधुकर नरवडे, सचिन वायाळ, कैलास नरवडे, विक्रम करंडे, माऊली नरवडे, किरण लबडे आदी उपस्थित होते. या वेळी जंतनाशक, गोचीडनाशक, तापनाशक, जुलाबरोधक औषधे व गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

श्री. विधाटे म्हणाले, की सध्या दुग्ध व्यवसायाला चांगले दिवस आले असून अनेक शेतकरी हा व्यवसाय करीत आहे. गोपालन करत असताना चांगल्या प्रकारे नियोजन केले तर चांगल्या प्रकारचा आर्थिक फायदा शेतकऱ्यांना मिळू शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी मुक्तसंचार गोठा गाईंसाठी उभारला पाहिजे.

Vaccination Of Animals
Animal Care : वाढलेल्या खुरांमुळे जनावरांवर काय परिणाम होतात?

वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे साथिचे आजार येत असतात. त्यामुळे आजारावर प्रतिबंधक म्हणून आजार येण्याआधीच लसीकरण करून घेतले पाहिजे. जनावरांना वंध्यत्व येऊ नये यासाठी काळजी घेतली पाहिजे.

त्याचप्रमाणे शासनाच्या वतीने विविध योजना गोपालकांसाठी राबविल्या जातात त्याचाही लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. अवसरी या ठिकाणी एक्स-रे मशिन उपलब्ध असून, या ठिकाणी आपल्या जनावरांचे एक्स-रे करायचे असतील तर त्या ठिकाणी जाऊन करू शकता, असेही त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com