खरिपात करा या चारापिकांची लागवड

खरिपात विविध चारा पिकांची लागवड करून, पशुपालक वर्षभर आपल्या जनावरांना हिरवा चारा देऊ शकतात. खरिपातील चाऱ्याचे योग्य नियोजन गरजेचं आहे. खरिपात चाऱ्यासाठी कोणत्या चारा पिकांची लागवड करावी याबद्दल जाणून घेऊया.
Fodder Plantation In Monsoon Season
Fodder Plantation In Monsoon Season Agrowon

खरीप हंगाम (kharif season) सुरु होतोय, खरिपाच्या दृष्टीने शेतकरी आता तयारी करू लागलेत. खरीप हंगामात विविध चारा पिकांची (fodder crops) लागवड करून, पशुपालक वर्षभर आपल्या जनावरांना हिरवा चारा देऊ शकतात. खरिपातील चाऱ्याचे योग्य नियोजन गरजेचं आहे. खरिपात चाऱ्यासाठी कोणत्या चारा पिकांची लागवड करावी याबद्दल आज आपण माहिती घेऊया.

जनावरांना दिल्या जाणाऱ्या चाऱ्यामध्ये विविध प्रकारचा एकदल, द्विदल प्रकारच्या चाऱ्याचा समावेश होतो. मागील वर्षी पावसाळ्यात जास्त पाऊस पडल्याने, शेतकऱ्याच्या पिकांचे प्रचंड नुकसान होऊन, चारा टंचाई (fodder scarcity) निर्माण झाली होती. त्यामुळे या वेळेस चारा लागवड करताना पावसाचा अंदाज घेऊन केल्यास फायदा दिसून येईल. नेपियर (Nepiyar) सारखे गवत जास्त पावसाच्या भागात देखील चांगले तग धरून राहते. चाऱ्याचे व्यवस्थापन करताना, आपल्याकडील एकूण जनावरांची संख्या, त्यांची शारीरिक अवस्था याचा विचार केला पाहिजे. तसेच जमिनीचा प्रकारही पहिला पाहिजे.

Fodder Plantation In Monsoon Season
जनावरांना विषबाधा होण्याची विविध कारणे

खरिपात चाऱ्यासाठी मका, ज्वारी, बाजरी, संकरित नेपिअर, चवळी, स्टायलो गवताची लागवड करू शकता. साधारणपणे एका ४०० ते ५०० किलो वजनाच्या जनावराला १५ ते २० किलो हिरव्या चाऱ्याची गरज असते.

Fodder Plantation In Monsoon Season
हादग्याची लागवड कशी करावी | Hadga Fodder for Goat Farming | ॲग्रोवन

समजा तुमच्याकडे १० दुधाळ जनावरे असतील तर या दहा जनावरांना एका दिवसाला २०० किलो हिरव्या चाऱ्याची गरज पडेल. भाकड किंवा लहान जनावरांना तुलनेत काहीसा कमी चारा लागतो. खरिपात साधारणपणे २४००० किलो चाऱ्याची गरज पडेल. वर्षाला ७३००० किलो म्हणजे ७३० क्विंटल हिरव्या चाऱ्याची गरज पडेल.

ज्वारीची पहिली कापणी ६५ ते ७० दिवसांनी मिळते. हेक्टरी उत्पादन ४५० ते ५०० क्विंटल मिळते.

बाजरीची पहिली कापणी ५५ ते ६० दिवसांनी मिळून हेक्टरी ४५० ते ५०० क्विंटल चारा उत्पादन मिळते.

चवळीचीही पहिली कापणी ६० ते ६५ दिवसांनी मिळते. हेक्टरी ३०० ते ३५० क्विंटल चाऱ्याचे उत्पादन मिळते.

संकरित नेपियर गवताच्या सुधारित जातींची लागवड केल्यास ६० दिवसांनी पहिली कापणी मिळते. एक महिन्याच्या अंतराने आठ ते नऊ कापण्या घेऊ शकता.

स्टायलो गवताची लागवड केल्यास हेक्टरी २०० ते २५० क्विंटल चाऱ्याचे उत्पादन मिळते. मात्र वर्षातून किमान दोन कापण्या घेऊ शकता.

साधारपणे ५० गुंठे जमीन असलेल्या शेतकऱ्यांनी प्रत्येकी १० गुंठ्यावर संकरित नेपिअर, चवळी, ज्वारीची लागवड करावी. मक्याची लागवड २० गुंठ्यावर करावी. या पाचही पिकांचे एकत्रित चारा उत्पादन घेतल्यास सरासरी ३०००० किलो हिरव्या चाऱ्याचे उत्पादन खरीप हंगामात मिळेल.

तुमच्याकडील जनावरांची एकूण संख्या लक्षात घेऊन, चाऱ्याचे उत्पादन घेतल्यास, चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. विविध उत्पादनक्षम चारा पिकांची लागवड सुधारित तंत्राचा वापर करून केल्यास जनावरांना संतुलित प्रमाणात हिरवा चारा देणे सोयीचे जाईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com