Animal Feed : जनावरांना द्या संतुलित आहार

आहारात नियमितपणा असावा. जनावरांच्या आहार प्रमाणात व घटकांत अचानक बदल करू नये. वाळलेला चारा, हिरवा चारा कुट्टी करूनच द्यावा.
Animal Feed
Animal FeedAgrowon

डॉ. सागर जाधव, डॉ. संतोष चांगण

सुदृढ जनावरांच्या आरोग्यासाठी सकस आहार (Healthy Animal Diet) आवश्यक असतो. प्रत्येक जनावराला त्यांच्या शारीरिक स्थितीनुसार आहाराचा पुरवठा (Animal Diet Management) होणे गरजेचे असते.

जनावरांचे वजन, वय, उत्पादन क्षमता या सर्व बाबी विचारात घेऊन पोषक अन्नघटकांचा योग्य प्रमाणात पुरवठा करणे यास ‘संतुलित आहार’ (Animal Diet) असे म्हणतात. आहारात विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे मिश्रण असणे आवश्यक आहे.

आहार कसा असावा ः

१) आहारात नियमितपणा असावा. जनावरांच्या आहार प्रमाणात व घटकांत अचानक बदल करू नये.

२) प्रत्येक जनावराला रोज वाळलेला चारा, हिरवा चारा (एकदल आणि द्विदल), पशुखाद्य (Animal feed) व खनिज मिश्रण द्यावे. वाळलेला चारा, हिरवा चारा कुट्टी करूनच द्यावा.

३) आहार शुष्क तत्त्वाच्या आधारावर द्यावा. देशी गाईंना २ ते २.५ टक्के तर म्हशींना व संकरित गाईंना त्यांच्या वजनाच्या २.५ ते ३ टक्के शुष्क पदार्थाची गरज असते.

४) पशू आहारात २/३ भाग वैरण तर १/३ भाग पशुखाद्य असावे.

५) एकदल वर्गातील हिरवा चारा (मका, कडवळ, ओट, बाजरी, नेपियर इ.) यामध्ये पिष्टमय पदार्थाचे प्रमाण जास्त असते.

६) द्विदल वर्गातील चारा (लुसर्न, बरसीम, सुबाभूळ, चवळी, शेवरी) यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.

७) वाळलेली वैरण जसे कडबा, सरमाड, पेंढा, वाळलेले गवत, बगॅस, गव्हाचे काड आणि उसाचे वाढे यामध्ये एकूण पचनीय पदार्थांचे प्रमाण फार कमी असते.

८) जनावरांच्या शरीराची खनिजांची गरज भागविण्यासाठी चिलेटेड खनिज मिश्रण देणे गरजेचे आहे.

९) हिरवा चारा मुबलक प्रमाणात दिल्यास पशुखाद्यावरील ३० टक्के खर्च कमी करता येतो.

Animal Feed
Animal Feed : दुभत्या जनावराचा आहार कसा असावा?

१०) संतुलित आहारासह पिण्यासाठी स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात पाणी द्यावे. दिवसातून साधारण ३ वेळा ताजे आणि स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे.

११) जनावरांना पिण्यासाठी दिले जाणारे पाणी वासरहीत, रंगहीन असावे. त्यात कोणतेही अपायकारक क्षार नसावेत. पाण्याची नियमित तपासणी करावी.

१२) जनावरांना पिण्यासाठी दररोज साधारणपणे ८० ते १०० लिटर पाणी द्यावे.

आहारात बायपास प्रथिने, फॅटचा वापर ः

चारा टंचाईच्या काळात दुभत्या जनावरांना खाद्यातून पुरेशा प्रमाणात प्रथिनांचा पुरवठा होत नाही. त्यामुळे दूध उत्पादनात घट येते. अशावेळी खाद्यातून प्रथिने मिळविण्यासाठी बायपास प्रथिनांचा समावेश करणे फायदेशीर ठरते.

बायपास फॅटचे पचन दुभत्या जनावरांच्या कोठीपोटात न होता, सरळ आतड्यामध्ये होते. परिणामी त्यापासून मिळणारी ऊर्जा ही फक्त दूध उत्पादनासाठी वापरली जाते.

परिणामी दूध उत्पादनात वाढ झालेली दिसून येते. तसेच जनावरांची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते. त्यासाठी जनावरांच्या आहारात बायपास प्रथिने व बायपास फॅटचा उपयोग करावा.

देखभालीसाठी आणि दुधासाठी खुराक मात्रा ः

(पशुखाद्यामध्ये प्रथिने १८ ते २० टक्के व ऊर्जा ६५ ते ७५ टक्के इतके प्रमाण असते.)

००---पशू देखभालीसाठी खुराकाची मात्रा---दुधासाठी खुराकाची मात्रा

गाय----१ ते १.२५ किलो---१ किलो प्रति २.५ लिटर दुधासाठी

म्हैस---२ किलो---१ किलो प्रति २ लिटर दुधासाठी

जनावरांच्या गाभण काळातील शेवटच्या ३ महिन्यांमध्ये देखभालीबरोबरच देशी गाईसाठी १.२५ किलो आणि संकरित गाई किंवा म्हशींसाठी १.७५ किलो जादा खुराक द्यावा.

संतुलित आहाराचे फायदे ः

१) जनावरांच्या शरीराची वाढ व एकूणच आरोग्य उत्तम राहते.

२) दूध उत्पादनात वाढ होते.

३) वासरांची योग्य वाढ होऊन लवकर माजावर येण्यास मदत होते.

Animal Feed
शेळ्यांना द्या सकस आहार...

४) रोगप्रतिकार क्षमता वाढते. परिणामी जनावरे आजारास बळी पडण्याचे प्रमाण कमी होते.

५) जनावरांचे आरोग्य सुधारते.

६) उपलब्ध चाऱ्याचा योग्य वापर होतो.

डॉ. सागर जाधव, ९००४३६१७८४

डॉ. संतोष चांगण, ९८६०१३५०१७

(डॉ. जाधव हे बाचणी (जि.कोल्हापूर) तर डॉ. चव्हाण हे येळवी (जि.सांगली) येथे पशुपोषणशास्त्र विभागात पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com