Goat Farming : शेतकरी नियोजन ः शेळीपालन

माझी दोन एकर शेती असून त्यामध्ये ऊस, आले, सोयाबीन, ज्वारी, गहू या प्रमुख पिकांचे उत्पादन घेतले जाते. तसेच साधारण २५ गुंठे क्षेत्रावर निशिगंधा, झेंडू, शेवंती, गुलाब आदी फुलांची लागवड केली आहे.
Goat Farming
Goat FarmingAgrowon

शेतकरी ः दीपक बळवंत जाधव

गाव ः काशीळ, जि. सातारा

एकूण शेळ्या ः २० शेळ्या, २ बोकड

शेळ्यांची जात ः उस्मानाबादी

---------------

माझी दोन एकर शेती असून त्यामध्ये ऊस, आले, सोयाबीन (Soybean), ज्वारी (Jowar), गहू (Wheat) या प्रमुख पिकांचे उत्पादन घेतले जाते. तसेच साधारण २५ गुंठे क्षेत्रावर निशिगंधा, झेंडू, शेवंती, गुलाब आदी फुलांची लागवड केली आहे.

शेती करीत असताना शेतीला पूरक व्यवसाय करायचा असा विचार सतत मनात यायचा. त्यासाठी विविध पूरक व्यवसायांची चाचपणी केली. त्यातून २०१२-१३ मध्ये गाई-म्हशीपालनास (Cow, Buffalo Rearing) सुरुवात केली. परंतु उत्पादित दुधास योग्य दर मिळत नव्हता आणि योग्य व्यवस्थापनासाठी मनुष्यबळाची कमतरता भासू लागली. त्यामुळे हळूहळू गाई-म्हशींची संख्या कमी केली.

पुढे २०१८ मध्ये शेळीपालन व्यवसायाविषयी माहिती घेतली. शेळीपालन व्यवसायातील अर्थकारण समजून घेतल्यानंतर हाच व्यवसाय करायचे ठरविले. त्यासाठी शेतामध्येच १०० बाय ७५ फूट आकाराच्या शेडची उभारणी केली. सध्या माझ्याकडे उस्मानाबादी जातीच्या २० शेळ्या अन् २ बोकड आहेत.

Goat Farming
प्रत्येक शेतकरी कुटुंबाला देणार एक शेळी ः केदार

निवारा व्यवस्थापन ः

- शेळ्यांच्या संगोपनासाठी शेतामध्येच १०० बाय ७५ फूट आकाराचे शेड उभारले आहेत. या शेडच्या आतमध्येच ३० बाय ३२ फूट आकाराचे पत्र्याचे शेड आणि उर्वरित भागात मुक्त संचार करण्याची व्यवस्था केली आहे.

- शेडमध्ये पिले, गाभण शेळी, नर आणि मादी असे एकूण ४ विभाग केले आहेत.

- शेडच्या बाजूने तारेचे कुंपण उभारले आहे. शेडच्या दोन्ही बाजूंनी मोकळी जागा सोडली आहे. त्यामुळे शेळ्यांना मुक्त संचार करता येतो.

- शेळ्यांचा चारा ठेवण्यासाठी शेडमध्येच स्वतंत्र व्यवस्था केली आहे.

- शेड दररोज स्वच्छ केले जाते. शेडमध्ये स्वच्छता व्यवस्थापनावर विशेष भर दिला जातो.

- शेळीपालनातून वर्षाअखेर साधारण ५ ट्रॉली लेंडीखत उपलब्ध होते. सर्व लेंडीखताचा वापर घरच्या शेतीमध्येच केला जातो.

Goat Farming
अपंगत्वावर मात करीत यशस्वी शेळी-मेंढीपालन

चारा व्यवस्थापन ः

- शेळ्यांना शेडमध्येच चाऱ्याची उपलब्धता केली जाते.

- चाऱ्यासाठी २० गुंठे क्षेत्रावर विविध चारा पिकांची लागवड केली आहे. त्यात हत्तीघास, मका, बाजरी आणि कडवळ इत्यादी चारा पिके आहेत.

- एका शेळीला सुका आणि ओला चारा असा एकूण ५ किलो चारा प्रतिदिन दिला जातो. सुक्या चाऱ्यामध्ये सोयाबीन, तूर, हरभऱ्याचा भुसा आणि कडबा तर ओल्या चाऱ्यामध्ये मेथी, दशरथ घास, तुतीचा पाला दिला जातो.

Goat Farming
शेळी, मेंढीमधील आंत्रविषार

आरोग्य व्यवस्थापन ः

- सर्व शेळ्यांना दर तीन महिन्यांनी प्रतिबंधात्मक लसीकरण तसेच जंताचे डोस दिले जातात.

- गाभण शेळ्यांना पशुवैद्यकांच्या सल्ल्याने योग्य लसीकरण केले जाते.

- गाभण शेळीच्या स्वतंत्र व्यवस्था करून विशेष काळजी घेतली जाते. गाभण काळात शेळीची योग्य काळजी घेतल्याने पिले ४ ते ५ किलो वजनाची मिळतात.

- नियोजनपूर्वक व्यवस्थापनामुळे दीड वर्षात दोन वेतांतून किमान ४ पिले मिळतात.

- योग्य व्यवस्थापनातून बोकडाचे सरासरी ४० ते ४५ किलो, तर शेळीचे ३० ते ३५ किलोपर्यंत वजन मिळते.

विक्री व्यवस्थापन ः

- शेळीचे सर्व दूध हे पिलांनाच पाजले जाते. दूध काढले जात नाही.

- उस्मानाबादी शेळ्यांना आणि बोकडांना बाजारात चांगली मागणी आहे. त्यामुळे शेडवरून जास्त विक्री होते. काही वेळा स्थानिक बाजारातही विक्री केली जाते.

- साधारण २५ ते ३० किलो वजन भरल्यानंतर बोकड आणि

शेळ्यांची विक्री केली जाते. त्यास प्रतिकिलो साधारण ६०० रुपये दर मिळतो.

-------------------

- दीपक जाधव, ९८२२८२०२४२

(शब्दांकन ः विकास जाधव)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com